एक्स्प्लोर

IPL 2023 : दिल्लीचा शेवट पराभवाने, चेन्नईचा 77 धावांनी विराट विजय

DC vs CSK, IPL 2023 : साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा 77 धावांनी विराट पराभव केला.

DC vs CSK, IPL 2023 : साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा 77 धावांनी विराट पराभव केला. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांच्या वादळी अर्धशतकानंतर गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. चेन्नईने दिलेल्या224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 146 धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीला 14 सामन्यात नवव्या पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीची यंदाच्या हंगामातील सुरुवात आणि शेवटही निराशाजनक झाला.  

चेन्नईचा प्लेऑफमध्ये प्रवेश

दिल्लाचा पराभव करत धोनीच्या चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. चेन्नईने 14 सामन्यात 17 गुणांची कमाई केली आहे. चेन्नईला आठ सामन्यात विजय मिळालाय. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारा चेन्नई दुसरा संघ आहे. याआधी गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. चेन्नई सध्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. पण लखनौ आणि कोलकाता यांच्यातील सामन्यावर चेन्नईने दुसरे स्थान अवलंबून आहे. लखनौने कोलकात्याचा विराट पराभव केल्यास चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर घसरु शकतो.. अशात लखनौ आणि कोलकाता यांच्यामध्ये क्वालिफायर एक सामना होईल. लखनौने कोलकात्याचा पराभव केल्यास.. चेन्नई आणि लखनौ यांच्यात समान गुण होतील.. अशात नेट रनरेटच्या आधावर क्वालिफायर एक मध्ये प्रवेश मिळेल. 

दिल्लीचा दारुण पराभव - 
चेन्नईने दिलेल्या 224 धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ स्वस्तात तंबूत परतला. पृथ्वी शॉ याने फक्त पाच धावांचे योगदान दिले. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर साल्ट आणि रुसोही लगेच तंबूत परतले. दीपक चाहर याने या दोघांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडले. एका बाजूला विकेट पडत असताना कर्णधार डेविड वॉर्नर याने  एक बाजू लावून धरली होती. वॉर्नर याने 86 धावांची एकाकी झुंज दिली. साल्ट 3, रुसो 0 धावांवर बाद झाले. यश धुल 13 आणि अक्षर पटेल  याने 15 धावांचे योगदान दिले. अमन खान सात तर ललीत यादव सहा धावांवर बाद झाले. कुलदीप यादव शून्यावर बाद झाला. डेविड वॉर्नरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावांपर्यंत मजल मारता आली नाही.  डेविड वॉर्नर याने एकाकी झुंज दिली. वॉर्नर याने 58 चेंडूत 86 धावांची खेळी केली. या खेळीत वॉर्नर याने पाच षटकार आणि सात चौकार लावले. पथिराणा याने वॉर्नरची खेळी संपुष्टात आणली. वॉर्नर याने एका बाजूने दिल्लीचा डाव सावरला. 

चेन्नईकडून दीपक चहर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलाय. दीपक चाहर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. महिश तिक्ष्णा आणि पथिराणा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तुषार देशपांडे आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

महत्त्वाच्या बातम्या

Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget