IPL 2023 Auction : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) 2023) साठीचा लिलाव (IPL 2023 Auction) डिसेंबरमध्ये पार पडणार अशी माहिती समोर येत होती. ज्यानंतर आता एक तारीखही समोर येत असून कोची इथे 23 डिसेंबरला आगामी आयपीएल 2023 साठीचा लिलाव पार पडणार अशी माहिती समोर येत आहे. बीसीसीआयनं सर्व संघाशी एका तात्पुरत्या वेळापत्रकाची चर्चा केल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती, ज्यानंतर आता तारीख समोर येत असून याबाबत अद्याप कोणती अधिकृत माहिती आलेली नाही.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2023 चा लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. तसंच, क्रिकेटची ग्रँड स्पर्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. जगातील अनेक देशांचे स्टार खेळाडू या लीगमध्ये खेळताना दिसत असल्याने सर्वांनाच या स्पर्धेची उत्सुकता आहे. यंदाच्या आयपीएल लिलावासाठी सर्व फ्रँचायझींच्या पर्सही वाढवल्या जाऊ शकतात. सर्व संघांचे एकूण बजेट 90 कोटींवरून 95 कोटींपर्यंत वाढू शकते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात आयपीएलसाठी मेगा लिलाव झाला होता, त्यावेळी सर्व संघांनी एकूण 204 खेळाडूंना खरेदी केले होते. ज्यानंतर यंदाही काही बदल होण्याची शक्यता आहे. 


आयपीएल पुन्हा Home Away Format मध्ये


आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसंबधित बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguy) याने काही दिवसांपूर्वीच एक नवी घोषणा केली. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली असून तो म्हणाला, ''मागील दोन वर्षे कोरोनामुळे आयपीएल नेहमीसारखी होत नव्हती, पण आता आयपीएल पुन्हा जुन्या ढंगात होणार आहे. ज्यामुळे आता प्रत्येक संघ आपले सात सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहे.'' टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ''पुरुषांच्या आयपीएलचा आगामी हंगाम पहिल्याप्रमाणे होम आणि अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे. ज्यामुळे सर्व दहा संघ त्यांचे 7 सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहेत. तसंच सध्या बीसीसीआय बहुप्रतिक्षित महिला आयपीएलवर काम करत आहे. आम्ही पुढच्या वर्षी पहिला हंगाम सुरू करण्याची शक्यता आहे.”  


हे देखील वाचा-