T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा अंतिम टप्प्यात आलाय. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सेमीफायनल खेळला जातोय. तर, भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे. या महत्वाच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं (Jos Buttler) भारत आणि पाकिस्तान यांच्या चाहत्यांना इशारा दिलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल होऊ देणार नसल्याचं बटलरनं स्पष्ट केलंय.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यापूर्वी जोस बटलरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फायनलसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर जोट बटलर  म्हणाला की, "भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल सामना खेळला जाईल, अशी आमची इच्छा नाही. यासाठी भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आम्ही पुरेसे प्रयत्न करू."


मार्क वूड, डेविड मलान दुखापतग्रस्त
मार्क वूड आणि डेविड मलानच्या दुखापतीबाबत बटलर म्हणाला की, भारतविरुद्ध सामन्यात मार्क वूड आणि डेविड मलान हे दोघेही सेमीफायनलमध्ये खेळणार की नाही याबाबत अजूनही शंका आहे. दोघंही सेमीफायनलसाठी तंदुरूस्त असावेत, अशी माझी इच्छा आहे.आम्ही आमच्या वैद्यकीय टीमवर अवलंबून राहू.”


भारतीय संघात जबरदस्त खेळाडू
भारतीय संघाबाबत जोस बटलर म्हणाला की, भारतीय संघ हा एक मजबूत आहे. त्यांच्या संघात चांगले खेळाडू आहे. सूर्यकुमार यादव सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तो असा फलंदाज आहे, ज्याच्याकडं सर्वप्रकारची शॉट्स आहेत. पण फलंदाजाला आऊट करण्यासाठी फक्त एका चेंडूची आवश्यकता असते आणि आम्ही तेच करण्यासाठी उत्सूक आहेत. 


भारत-पाकिस्तान सामन्यासाठी लोकांमध्ये उत्सूकता
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तानच्या संघाला पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांसह माजी क्रिकेटपटूंमध्ये मोठी उत्सकूता पाहायला मिळत आहे. ज्यात शोएब अख्तर, शेन वॉटसन, आणि एबी डिव्हिलियर्स यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल होणार की नाही? हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, 2007च्या टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ शेवटचा फायनल खेळले होते. ज्यामध्ये टीम इंडियाचा विजय झाला होता.


हे देखील वाचा-