IPL 2022: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) अनकॅप खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडलाय. अनकॅप खेळाडूंवर मूळ किंमतीपेक्षा अधिक पैशांचा वर्षाव करण्यात आला. तर, काही अनकॅप खेळाडूंना त्यांच्या मूळ किंमतीत खरेदी करण्यात आलं. आयपीएलच्या मेगा ऑक्शनदरम्यान राजस्थानच्या संघानं (Rajasthan Royals) जोधपूरचा (Jodhpur) शुभम गढवालला (Shubham Garhwal) त्याच्या मूळ किंमतीत खरेदी करत त्याच्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली. राजस्थानच्या संघात शुभम गढवालची निवड झाल्यानं त्याच्या आई-वडिलांसह नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. परंतु, शुमन गढवाल याचा क्रिकेटचा प्रवास नेमका कसा होता? त्याच्या वडिलांचं स्वप्न काय होतं? हे जाणून घेऊयात.
शुभम गढवाल हा जोधपूरच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहे. शुभमनं लाकडी बॅट घेऊन क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. आपल्या मुलानं इंजिनिअरचं शिक्षण घेऊन इंजिनिअर व्हावं, अशी शुभमच्या वडिलांची इच्छा होती. तर, शुभम भविष्यात चांगला क्रिकेटपटू बनू शकतो, अशी त्याचे प्रशिक्षक प्रदुत सिंहला यांना आशा होती.
इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला पाठवलं
शुभमच्या वडिलांना त्याला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला पाठवलं होतं. परंतु, शुभमच्या प्रशिक्षकानं त्याला वारंवार फोन करून इंजिनिअरिंग करण्यास मनाई केली. शुभम हा भविष्यात मोठा खेळाडू बनू शकतो, अशी त्यांना आशा होती. एवढेच नव्हेतर शुभम भविष्यात भारतीय संघाचा भाग होऊ शकतो, असंही त्यांना वाटत होतं. त्यानंतर शुभमनं इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडून अधिक मेहनत घेतली. ज्यामुळं आज त्याची राजस्थानच्या संघात निवड झालीय.
हे देखील वाचा-
- IPL 2022, Mega Auction : 551 कोटी, 204 खेळाडू आणि 10 संघ... आयपीएल मेगा ऑक्शनच्या हायलाइट्स
- IPL Auction 2022: हार्दीकच्या टोळीत हे आहेत महारथी, असा आहे गुजरात टायटन्सचा संघ
- Lucknow Super Giants Final Squad 2022: केएल राहुलसारखा कर्णधार, तर अष्टपैलूंचा भरणा, लखनौचा संघ पाहिलात का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha