IPL Auction 2022 Highlights : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) महालिलावात दोन दिवसांमध्ये 10 फ्रेचायझींनी 204 खेळाडूंना खरेदी केलं. बंगळुरुमध्ये पार पडलेल्या दोन दिवसांच्या लिलावात गुजरात टायटन्स संघाने (Gujarat Titans) 20 खेळाडूंना खरेदी केलं आहे. गुजरात संघाने न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्यूसनसाठी दहा कोटी रुपये मोजले आहेत. तसेच राहुल तेवातियासाठी 9 कोटी रुपयांची बोली लावली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातचा संघ आयपीएलच्या 15 व्या हंगामात उतरणार आहे.


बंगळुरु येथे सुरु असलेला लिलाव संपला आहे. दोन दिवसांत 10 फ्रेचायझींनी 204 खेळाडूंना खरेदी केलं आहे. यासाठी फ्रेचायझींनी 5,51,70,00,000 रुपये खर्च केले आहे. 67 विदेशी खेळाडूंना दहा संघात खरेदी करण्यात आले आहे. तर 137 भारतीय खेळाडूंवर बोली लागली. यंदाच्या आयपीएलमध्ये युवा ईशान किशन सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे. मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्स संघाने हार्दिक पांड्या (Hardik Pandya), राशिद खान (Rashid Khan) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांना ड्राफ्टमधून खरेदी केलं होतं.  दोन दिवसांच्या लिलावानंतर पाहूयात गुजरातचा संघ कसा दिसतेय...  


असा आहे गुजरातचा संघ -
शिलेदार – हार्दिक पंड्या (15 कोटी), राशिद खान (15 कोटी) शुभमन गिल (8 कोटी), मोहम्मद शमी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी), अभिनव सदरंगानी (2.6 कोटी), राहुल तेवातिया (9 कोटी), नूर अहमद (30 लाख), साई किशोर (3 कोटी), डॉमनिक ड्रेक्स (1.10 कोटी), जयंत यादव (1.70 कोटी), विजय शंकर (1.40 कोटी), दर्शन नालकंडे (20 लाख), यश दयाल (3.20 कोटी), अल्झारी जोसेफ (2.40 कोटी), प्रदीप सांगवान (20 लाख), मॅथ्यू वेड (2.40 कोटी), वृद्धिमान साहा – (1.90 कोटी), डेविड मिलर – ( 3 कोटी),  वरुण अरॉन- 50 (लाख रुपये), गुरकीरत मान सिंह- (50 लाख रुपये), नूर अहमद – (30 लाख रुपये), साईं सुदर्शन- 20 लाख रुपये