Lucknow Super Giants Final Squad 2022: यंदाची आयपीएल (IPL 2022) अतिशय चुरशीची होणार आहे, कारण यंदा 8 जागी 10 संघ ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. या आधीच्या 8 संघासह लखनौ आणि अहमदाबाद हे दोन संघ जॉईन झाले आहेत. यावेळी केएल राहुलला लखनौैने कर्णधार म्हणून घेतलं असताना महालिलावात त्यांनी तगड्या खेळाडूंना संघात सामिल करुन घेतलं आहे.


महालिलावापूर्वी लखनौ संघाला (Lucknow Super Giants) ज्याप्रमाणे इतर संघानी रिटेन खेळाडू केले, तसंच काही खेळाडू आधी घेण्याची मुभा मिळाली होती. ज्यात त्यांनी कर्णधार म्हणून केएल राहुलला तर अष्टपैलू स्टॉयनिस आणि फिरकीपटू रवी बिष्णोईला संघात घेतलं. ज्यानंतर आता महालिलावात सर्वात महागडा खेळाडू म्हणून आवेश खानला 10 कोटींना खरेदी करत काही धाकड अष्टपैलू संघात घेतले आहेत. ज्यात जेसन होल्डर, दीपक हूडा, कृणाल पंड्या, मार्क वूड अशी नावं आहेत. तर अनुभवी क्विन्टॉन डी कॉक हा अष्टपैलू फलंदाज म्हणून संघात असणार आहे.


असा आहे लखनौचा संघ


लोकेश राहुल (17 कोटी), मार्कस स्टॉईनिस (9.2 कोटी), रवी बिष्णोई (4 कोटी), क्विन्टॉन डी कॉक (6.75 कोटी), मनिष पांडे (4.60 कोटी), जेसन होल्डर (8.75 कोटी), दीपक हूडा (5.75 कोटी), कृणाल पंड्या (8.25 कोटी), मार्क वूड (7.50 कोटी), आवेश खान (10 कोटी), अंकित राजपूत (50 लाख), के. गौतम (90 लाख), दुष्मन्ता चमिरा (2 कोटी), शाहबाज नदीम (50 लाख), मनन व्होरा (20 लाख), मोहसीन खान (20 लाख), आयुष बदोनी (20 लाख), करण शर्मा (20 लाख), कायल मेयर्स (50 लाख), मयांक यादव  (20 लाख), एविन लुईस (2 कोटी), 


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha