एक्स्प्लोर

IPL 2022 : आरसीबीचा दारुण पराभव, हैदराबादचा 9 गड्यांनी विजय

IPL 2022 : सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 72 चेंडू आणि नऊ गडी राखून पराभव केला. हैदराबादने यंदाच्या हंगमातील सलग पाचवा विजय नोंदवला आहे.

Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad : ब्रेबॉन स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 72 चेंडू आणि नऊ गडी राखून पराभव केला. हैदराबादने यंदाच्या हंगमातील सलग पाचवा विजय नोंदवला आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर हैदराबादने दणक्यात पुनरागमन करत सलग पाच विजय मिळवले. यासह दहा गुण घेत हैदराबादने गुणतालिकेत दुसरं स्थान पटाकवले आहे. तर आरसीबीचा हा तिसरा पराभव आहे. आठ सामन्यात आरसीबीने पाच विजय मिळवले आहे. या पराभवासह आरसीबी गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे.  

आरसीबीने दिलेले 69 धावांचं मापक आव्हान हैदराबादने आठ षटकात एका गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले. हैदराबादकडून अभिषेक शर्माने 47 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. कर्णधान केन विल्यमसन 16 तर राहुल त्रिपाठी 7 धावा काढून नाबाद राहिला. आरसीबीकडून हर्षल पटेल याने एकमेव विकेट घेतली. 

हैद्राबादच्या वादळात RCB ची दाणादाण! 
मार्को जानसन आणि नटराजन यांच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीचा संपूर्ण संघ 16.1 षटकात 68 धावांत संपुष्टात आला. आरसीबीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. सुयेश प्रभुदेसाईनं आरसीबीकडून सर्वाधिक धावा कोल्या. सुयेश प्रभुदेसाईने 15 धावांची खेळी केली. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेकीचा कौल जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी आग ओकणारी गोलंदाजी केली. दुसऱ्याच षटकात आरसीबीचे आघाडीचे तिन्हीही फलंदाज माघारी परतले. विराट कोहली आणि अनुज रावत यांनाही एकाही धाव काढता आली नाही. तर फाफ डु प्लेसिस 5 धावा काढून बाद झाला. ग्लेन मॅक्सेवलही 12 धावा काढून नटराजनचा शिकार झाला. हैदराबादच्या गोलंदाजीसमोर आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. एकाही फलंदाजाला षटकार मारता आला नाही. आरसीबीकडून फक्त सहा चौकार लगावण्यात आले. यात मॅक्सेवलने दोन तर फाफ डु प्लेसिस, सुयेश प्रभुदेसाई, शाबाज अहमद आणि वानंदु हसरंगा यांन प्रत्येकी एक एक चौकार लगावले. 

आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही - 
हैदराबादच्या भेदक माऱ्यापुढे आरसीबीच्या आठ फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. विराट कोहली अनुज राव आणि दिनेश कार्तिक शून्य धावसंख्येवर बाद झाले. तर फाफ डु प्लेसिस 5, शाबाज अहमद 7, हर्षल पटेल 4, वानंदु हसरंगा 8, मोहम्मद सिराज 2 धावा काढून बाद झाले. आरसीबीच्या फलंदाजापेक्षा अतिरिक्त धावसंख्या जास्त होत्या. आरसीबीला अतिरित्क 12 धावा मिळाल्या. त्याबळावर आरसीबीने 60 धावांचा टप्पा पार केला, असे म्हटल्यास वावगे वाटायला नको. 

हैदराबादचा भेदक मारा - 
पहिल्या षटकांपासून हैदाराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केली. मार्को जानसन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी तीन तीन बळी घेतले. तर जगतीश सुचितला दोन विकेट मिळाल्या. भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget