PBKS vs SRH : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 28 व्या पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (PBKS vs SRH) सामन्यात हैदराबादने आधी भेदक गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजी करत सात विकेट्सनी पंजाबवर विजय मिळवला आहे. आधी हैदराबादने उत्तम गोलंदाजीच्या जोरावर 151 धावांत पंजाबला रोखलं. ज्यानंतर मार्करम आणि पूरन यांच्या अभेद्य भागिदारीच्या जोरावर त्यांनी 18.5 षटकात 152 धावांचे लक्ष्य पार करत सात विकेट्सनी विजय मिळवला. हा त्यांचा स्पर्धेतील चौथा विजय असल्याने ते गुणतालिकेतही चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत.



सर्वात आधी सामन्यात नाणेफेकीनंतर सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या गोलंदाजांनी हा निर्णय अगदी चोख असल्याचं दाखवत पंजाबला मोठी धावसंख्या उभी करु दिली नाही. पंजाबचा लियाम सोडता सर्व खेळाडू खराब कामगिरी करु शकल्याने पंजाबने 151 धावा केल्या. यावेळी सामन्याच्या सुरुवातीलाच पंजाबचे सलामीवीर शिखर (8) आणि प्रभसिमरन (14) स्वस्तात माघारी परतले. जॉनी देखील 12 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर लियामने दमदार खेळी करत 60 धावांची महत्तपूर्ण खेळी केली. शाहरुख खानने 26 धावांची साथ त्याला दिल्यामुळे संघाने दीडशे धावांपर्यंत मजल मारली.  अखेरच्या षटकात हैदराबादचा वेगवान गोलंदाज उम्रानने दमदार अशा तीन विकेट्स घेतल्या. तर एक खेळाडू धावचीत झाला. त्यामुळे अखेरच्या षटकात एकही धाव न जाता पंजाबचे चार गडी शून्यावर माघारी परतले. 


पूरन-मार्करमची अभेद्या भागिदारी


152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची पहिली विकेट कर्णधार विल्यमसनच्या (3) रुपात स्वस्तात गेली. त्यानंतर राहुलने अभिषेक शर्मा सह एक चांगली भागिदारी रचली पण आधी राहुल 34 आणि मग शर्मा 31 धावा करुन तंबूत परतले. पण त्यानंतर निकोलस पूरन आणि अॅडन मार्करम यांनी दमदार भागिदारी रचत 152 धावांचे लक्ष्य 18.5 षटकात पार केले. यावेळी पूरनने नाबाद 35 आणि मार्करमने नाबाद 41 रन ठोकले. पंजाबकडून राहुल चाहरने दोन तर रबाडाने एक विकेट घेतली.


 हे देखील वाचा-