PBKS vs SRH : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील आजच्या 28 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद अशी (PBKS vs SRH) अशी लढत पार पडत आहे. सामन्यात पंजाबने अष्टपैलू स्टार खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर 151 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आता हैदराबादला विजयासाठी 152 धावा करायच्या आहेत.


सामन्यात पंजाब संघाचा कर्णधार मयांक अगरवालच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे तो सामन्यात खेळत नसून शिखर धवन कर्णधार म्हणून खेळत आहेत. सामन्यात नाणेफेकीनंतर सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या गोलंदाजांनी हा निर्णय अगदी चोख असल्याचं दाखवत पंजाबला मोठी धावसंख्या उभी करु दिली नाही. पंजाबचा लियाम सोडता सर्व खेळाडू खराब कामगिरी करु शकल्याने पंजाबने 151 धावा केल्या असून हैदराबादला विजयासाठी 152 धावा करायच्या आहेत.


 


लियामची एकाकी झुंज


सामन्यात सुरुवातीलाच पंजाबचे सलामीवीर शिखर (8) आणि प्रभसिमरन (14) स्वस्तात माघारी परतले. जॉनी देखील 12 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर लियामने दमदार खेळी करत 60 धावांची महत्तपूर्ण खेळी केली. शाहरुख खानने 26 धावांची साथ त्याला दिल्यामुळे संघाने दीडशे धावांपर्यंत मजल मारली. 


उम्रानची भेदक गोलंदाजी


अखेरच्या षटकात हैदराबादचा वेगवान गोलंदाज उम्रानने दमदार अशा तीन विकेट्स घेतल्या. तर एक खेळाडू धावचीत झाला. त्यामुळे अखेरच्या षटकात एकही धाव न जाता पंजाबचे चार गडी शून्यावर माघारी परतले. 


 हे देखील वाचा-