GT vs CSK: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 29 व्या सामन्यात गुजरातचा टायटन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्जशी (Gujarat Titans vs Chennai Super Kings) भिडणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर आज हा सामना खेळला जाणार आहे. या हंगामात गुजरातच्या संघानं पाच पैकी चार सामने जिंकत आपली छाप सोडली आहे. तर, चेन्नईच्या संघानं पहिले चार सामने गमावल्यानंतर पाचव्या सामन्यात बंगळुरूला पराभूत करून पहिला विजय मिळवला आहे. यातच चेन्नईची डोकेदुखी वाढवणारी माहिती समोर आली आहे. गुजरातकडून अफगाणिस्तानचा विस्फोटक फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या हंगामात मॅथ्यू वेडनं आतापर्यंत गुजरात टायटन्ससाठी सलामी दिली आहे. मात्र, त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. तो गेल्या काही सामन्यांपासून सतत फ्लॉप ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानचा स्फोटक फलंदाज रहमानउल्ला गुरबाज आज चेन्नईविरुद्धच्या सामन्यात डावाची सुरुवात करू शकतो. जेसन रॉयच्या जागी गुरबाजचा संघात समावेश करण्यात आला होता.
चेन्नई सुपर किंग्ज:
रॉबिन उथप्पा, रुतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकिपर), ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, महेश तिक्षणा, मुकेश चौधरी, अॅडम मिल्ने, ड्वेन प्रिटोरियस, डेव्हॉन कॉनव्हे, मिचेल सँटनर, तुषार देशपांडे, हरी निशांत, एन जगदीसन, सुभ्रांशु सेनापती, प्रशांत सोलंकी, केएम आसिफ, सिमरजीत सिंह, राजवर्धन हंगरगेकर, भगत वर्मा.
गुजरात टायटन्स:
मॅथ्यू वेड (विकेटकिपर), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, यश दयाल, वृद्धिमान साहा, प्रदीप संगवान, वरुण आरोन, जयंत यादव, गुरकीरत सिंह मान, अल्झारी जोसेफ, रविश्रीनिवासन साई किशोर, दर्शन नालकांडे, रहमानउल्ला गुरबाज, डॉमिनिक ड्रेक्स, साई सुदर्शन, नूर अहमद.
हे देखील वाचा-
- Shane Watson on Mumbai Indians: ईशान किशनवर 15 कोटी खर्च करणं मुंबईची सर्वात मोठी चूक- शेन वॉटसन
- Deepak Chahar: आयपीएलमधून बाहेर पडलेल्या दीपक चहरला 14 कोटी मिळणार का? येथे मिळवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर
- IPL 2022: आयपीएल आणि गर्लफ्रेन्डमध्ये पठ्ठ्यानं कोणाला निवडलं? मैदानावरील पोस्टरची सोशल मीडियावर तुफान चर्चा