SRH vs KKR Match Live Update : राहुल त्रिपाठी-मार्करम यांची वादळी खेळी, हैदराबादचा सात विकेटनं विजय
SRH vs KKR Match Live Update : केन विल्यमसन हैदराबाद संघाचं तर श्रेयस अय्यर कोलकाता संघाचं नेतृत्व करत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने
SRH vs KKR Match Live Update : सनरायजर्स हैदराबादने सात विकेटनं कोलकात्याचा पराभव केला.
SRH vs KKR Match Live Update : मार्करम याने आयपीएलमधील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मार्करमने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले
SRH vs KKR Match Live Update : आंद्रे रसेलनं धोकादायक राहुल त्रिपाठीला बाद करत कोलकात्याला तिसरं यश मिळवून दिले. राहुल त्रिपाठीने 37 चेंडूत 71 धावांची खेळी केली. हैदराबादला विजयासाठी 34 चेंडूत 43 धावांची गरज
SRH vs KKR Match Live Update : हैदराबादच्या राहुल त्रिपाठीनं कोलकात्याच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. राहुल त्रिपाठीने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं. राहुल त्रिपाठीने चार चौकार आणि चार षटकारासह अर्धशतक झळकावलं.
SRH vs KKR Match Live Update : कोलकात्याने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने दणक्यात सुरुवात केली. सात षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात हैदराबादने 70 धावा केल्या
SRH vs KKR Match Live Update : नितेश राणाची अर्धशतकी खेळी आणि आंद्रे रसेलचा फिनिशिंग टचच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 175 धावा केल्या. नितेश राणा याने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तर आंद्रे रसेल याने 49 धावांची खेळी केली.
SRH vs KKR Match Live Update : मोक्याच्या क्षणी कोलत्याला आठवा धक्का बसला आहे. सुचितने अमनला बाद केले.
SRH vs KKR Match Live Update : भुवनेश्वर कुमार याने पॅट कमिन्सला बाद करत मोठा अडथळा दूर केला. कोलकात्याला सातवा धक्का बसला आहे. कोलकाता सात बाद 153 धावा
IPL 2022, SRH vs KKR Match Live Update : नटराजन याने नितेश राणाला बाद करत कोलकात्याला सहावा धक्का दिला. राणाने 54 धावा केल्या.
IPL 2022, SRH vs KKR Match Live Update : शेल्डन जॅक्सन सहा धावांवर बाद, कोलकात्याला पाचवा धक्का
IPL 2022, SRH vs KKR Match Live Update : : नितेश राणाच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर कोलकात्याने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. 12.5 षटकांत चार बाद 103 धावा
SRH vs KKR Match Live Update : टी नटराजन याने एकाच षटकात कोलकात्याच्या दोन फलंदाजांना बाद केले आहे. नारायनण (6) आणि वेंकटेश अय्यर (6) यांना केले बाद. कोलकात्याच्या अडचणीत वाढ.
SRH vs KKR Match Live Update : टी नटराजन याने एकाच षटकात कोलकात्याच्या दोन फलंदाजांना बाद केले आहे. नारायनण (6) आणि वेंकटेश अय्यर (6) यांना केले बाद. कोलकात्याच्या अडचणीत वाढ.
SRH vs KKR Match Live Update : मार्को जेनसन याने कोलकात्याला पहिला धक्का दिला. अॅरॉन फिंच सात धावा काढून बाद झाला.
SRH vs KKR Match Live Update : कोलकात्याकडून वेंकटेश अय्यर आणि फिंच सलामीला मैदानात उतरलेत, तर हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार टाकणार पहिलं षटक
SRH vs KKR Match Live Update : अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकिपर), ए. मार्करम, शशांक सिंह, जगदीश सुचित, उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मार्को जेनसन
SRH vs KKR Match Live Update : अॅरॉन फिंच, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितेश राणा, आंद्रे रसेल, शेल्डॉन जॅक्सन (विकेटकिपर), पॅट कमिन्स, सुनिल नारायन, उमेश यादव, वरुण चर्कवर्ती, अमन खान
SRH vs KKR Match Live Update : हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
SRH vs KKR Match Live Update : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज अॅरोन फिंच याला केकेआरची कॅप देण्यात आली आहे. त्यामुळे फिंच 11 मध्ये खेळणार हे नक्की झाले आहे. तसेच अजिंक्य रहाणेला आराम दिला जाऊ शकतो.
SRH vs KKR Match Live Update :कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये नाणेफेक महत्वाची ठरत आहे.
SRH vs KKR Match Live Update : फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंह, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर(कर्णधार), अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक डार, शिवम मावी, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन.
SRH vs KKR Match Live Update : केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, मार्करम, निकोलस पूरण, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णु विनोद, ग्लेन फिलिप्स, आर समर्थ, शशांक सिंह, वाशिंगटन सुंदर, रोमेरियो शेफर्ड, मार्को जेनसन, जे सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन एबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फजलहक फारूकी, उमरान मलिक, टी नटराजन.
SRH vs KKR Match Live Update : मागील काही वर्षांपासून अजिंक्य रहाणेला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या कसोटी संघातूनही रहाणेला वगळण्यात आले होते. अजिंक्य रहाणे दणक्यात पुनरागमन करेल, अशी चाहत्यांना आशा आहे. कोलकाताने लिलावात अजिंक्य रहाणेला खरेदी केले आहे. कोलकातालाही अजिंक्य रहाणेकडून मोठ्या आपेक्षा आहेत. अजिंक्य रहाणे या आपेक्षा पूर्ण करणार का? येणाऱ्या काळातच दिसेल.
SRH vs KKR Match Live Update : आयपीएलच्या 15 व्या हंगामात अजिंक्य राहणेची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात रहाणेनं फक्त 80 धावा चोपल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे, अजिंक्य रहाणेला 15 व्या हंगामात एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. रहाणेचा स्ट्राईक रेटही फक्त 100 राहिला आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेला प्लेईंग 11 मध्ये खेळवणार का? याबाबत शंका आहे.
SRH vs KKR Match Live Update : आयपीएलमध्ये आतापर्यंत 21 सामन्यांमध्ये हैदराबाद आणि कोलकाता संघ आमनेसामने आले आहेत. या 21 सामन्यांपैकी हैदराबादनं 7 तर कोलकातानं 14 सामने जिंकले आहेत. मागील आकडेवारीच्या आधारे केकेआरचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. पण यावेळी दोन्ही संघात मोठे बदल झाले आहेत, त्यामुळे आजचा सामना कोणता संघ जिंकेल? हे सांगणं कठीण आहे.
Covid Outbreak in IPL : आयपीएलच्या 15 व्या हंगामावर कोरोनाचं संकट येण्याची शक्यता आहे. कारण आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाने एन्ट्री केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे (DC) फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी आयपीएलने याबाबतची माहिती दिली आहे. पॅट्रिक फरहार्ट संध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.
पार्श्वभूमी
IPL 2022, SRH vs KKR Match Live Update : सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (Sunrisers Hyderabad Vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज आयपीएल 2022 मधील 25 सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळला जाणार आहे. केन विल्यमसन हैदराबाद संघाचं तर श्रेयस अय्यर कोलकाता संघाचं नेतृत्व करत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. संथ सुरुवातीनंतर हैदराबाद संघाने चेन्नई आणि गुजरात संघाविरोधात विजय मिळवला आहे. कोलकाता संघाचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने हैदराबादचा संघ मैदानात उतरणार आहे. विजयाच्या पटरीवर परतणाऱ्या हैदराबाद संघाला कोलकाताविरोधात संघात बदल करावा लागणार आहे. हैदराबादच्या वॉशिंगटन सुंदरला दुखापतीमुळे कोलकाताविरोधातील सामन्याला मुकावे लागणार आहे. वॉशिंगटन सुंदरची कमी हैदराबाद संघाला जाणवणार आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये आतापर्यंत 21 सामन्यांमध्ये हैदराबाद आणि कोलकाता संघ आमनेसामने आले आहेत. या 21 सामन्यांपैकी हैदराबादनं 7 तर कोलकातानं 14 सामने जिंकले आहेत. मागील आकडेवारीच्या आधारे केकेआरचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. पण यावेळी दोन्ही संघात मोठे बदल झाले आहेत, त्यामुळे आजचा सामना कोणता संघ जिंकेल? हे सांगणं कठीण आहे.
सनराइजर्स हैदराबादचा संघ:
केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, मार्करम, निकोलस पूरण, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णु विनोद, ग्लेन फिलिप्स, आर समर्थ, शशांक सिंह, वाशिंगटन सुंदर, रोमेरियो शेफर्ड, मार्को जेनसन, जे सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन एबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फजलहक फारूकी, उमरान मलिक, टी नटराजन.
कोलकाता नाइट राइडर्स:
फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंह, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर(कर्णधार), अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक डार, शिवम मावी, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -