Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
Mutual Funds Investments : म्युच्यूअल फंडमध्ये एसआयपीद्वारे दरमहा ठराविक रकमेची गुंतवणूक करता येते. दरमहा तुमच्या खात्यातून रक्कम म्युच्यूअल फंडमध्ये एसआयपीद्वारे केल्यास चांगला परतावा मिळतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडिसेंबर 2024 मध्ये एसआयपीद्वारे 26 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक म्युच्यूअल फंडमध्ये झाली. असोसिएशन ऑफ म्युच्यूअल फंड्स इन इंडियानं गुरुवारी आकडेवारी जाहीर केली.
डिसेंबर 2024 मध्ये एसआयपीद्वारे 26459 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये 25320 कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे आली. इक्विटी मार्केटमध्ये जगभरातील आव्हानात्मक स्थिती असताना डिसेंबर 2024 मध्ये म्युच्यूअल फंडमधील गुंतवणुकीत वाढ होत आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदारांनं 1000 रुपयांची एसआयपी सुरु केल्यानंतर त्याला कोट्याधीश व्हायचं असल्यास किती वर्ष लागतील हे समीकरण कसं असू शकतं. दरमहा 1000 रुपयाची एसआयपी सुरु केल्यानंतर दरवर्षी 10 टक्के स्टेपअप केल्यास आणि 12 टक्के परतावा गृहित धरल्यास 1 कोटी रुपयांची रक्कम जमा होण्यास 31 वर्ष लागतील.
5000 रुपयांची दरमहा एसआयपी सुरु केल्यास आणि वार्षिक 10 टक्के स्टेप केल्यास आणि 12 टक्के सीएजीआर जारी केल्यास 12 टक्के गृहित धरल्यास 24 वर्षात 1.10 कोटी रुपयांचा निधी जमा होऊ शकतो. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)