मुंबई : भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) अव्वल दर्जाचे फलंदाज आणि गोलंदाज आहेत. पण अष्टपैलू खेळाडूंची तशी पूर्वीपासूनच वानवा आहे. दरम्यान भारताला सर्वात पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्यासारखी सर कोणत्याच खेळाडूला आजवर आलेली नाही. दरम्यान भारताचा दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिकला मात्र संघातील एका खेळाडूचा खेळ कपिल देव यांच्याप्रमाणे वाटत असल्याचं वक्तव्य त्याने केलं आहे.


तर दिनेशला कपिल यांच्याप्रमाणे वाटणारा खेळाडू म्हणजे सध्याचा स्टारऑलराऊंडर रवीचंद्रन अश्विन (R Ashwin). सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यातही चमकदार कामगिरी करणाऱ्या आश्विनने भारताला विजयाच्या अगदी जवळ आणलं आहे. त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यातही त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव करत दिनेशने त्याला थेट कपिल देव यांच्याप्रमाणे असल्याचा सन्मान दिला आहे.


'आश्विनचं नाव कपिल देव यांच्यासोबत घ्यावं'


कानपूर कसोटीत आश्विनच्या दमदार कामगिरीबाबत बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला, ''मला वाटतं जेव्हाही भारतीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंचं नाव निघेल, तेव्हा कपिल देव यांच्यासोबत आश्विनचंही नाव घ्यायला हवं. कारण दोघेही मॅचविनर खेळाडू असून स्टार ऑलराऊंडर आहेत.” कार्तिकने क्रिकबजशी बोलताना ही माहिती दिली.


आश्विनने रचला विक्रम


कानपूर कसोटीत आश्विनने एका नव्या विक्रमाला गवासणी घातली आहे. त्याने 418 विकेट पूर्ण करत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने हरभजनला (417) मागे टाकलं असून आता कपिल देव (434) आणि अनिल कुंबळे (619)  हे फक्त आश्विनच्या पुढे आहेत.



संबधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha