RCB vs PBKS, Match Live Updates : पंजाबचा आरसीबीवर विजय

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ मैदानात उतरणार असून दोघांना पुढील फेरीत पोहोचण्यासाठी आज विजय महत्त्वाचा आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 May 2022 11:26 PM
पंजाबचा आरसीबीवर विजय

निर्णायक सामन्यात पंजाबने आरसीबीचा 54 धावांनी पराभव केला. 

आरसीबीला नववा धक्का, सामना पंजाबच्या बाजूने झुकला

हर्षल पटेलच्या रुपाने आरसीबाला नववा धक्का बसला आहे. हर्षल पटेल 11 धावांवर बाद झाला. 

आरसीबीला आठवा धक्का, हसरंगा बाद

हसरंगाच्या रुपाने आरसीबीला आठवा धक्का बसला आहे. पंजाबने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

आरसीबीला सातवा धक्का, शाहबाज बाद

आरसीबीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. कार्तिकनंतर आता शाहबाजही बाद झालाय.

आरसीबीला मोठा धक्का, कार्तिक बाद

कार्तिकच्या रुपाने आसीबीला सहावा धक्का बसला आहे..कार्तिक 11 धावा काढून बाद झाला.. 

आरसीबीच्या अडचणी वाढल्या, सामन्यावर पंजाबचं वर्चस्व

आरसीबीला विजयासाठी 32 चेंडूत 90 धावांची गरज.. सर्व मदार दिनेश कार्तिकवर

  RCB vs PBKS, Match Live Updates : RCB ला अर्धा संघ तंबूत, मॅक्सवेलही बाद

रजत पाटीदारच्या रुपाने आरसीबीला चौथा धक्का बसला. पाटीदारनंतर मॅक्सवेलही लगेच तंबूत रतला. राहुल चाहरने पाटीदारला 26 धावांवर बाद केले.  तर हरप्रीद बारने मॅक्सवेलाला 35 धावांवर तंबूत पाठवले. 

RCB vs PBKS : बंगळुरुला लागोपाठ दोन झटके

एकाच षटकात पंजाबच्या रिषी धवनने बंगळुरुचा कर्णधार फाफ आणि माहिपाल लोमरोरला तंबूत धाडलं आहे.

RCB vs PBKS : विराट कोहली बाद

14 चेंडूत 20 धावा ठोकून विराट कोहली आजही स्वस्तात माघारी परतला आहे. रबाडाने त्याला तंबूत धाडलं आहे.

RCB vs PBKS : बंगळुरुसमोर 210 धावांचे आव्हान

जॉनी आणि लियाम यांच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने 209 धावांचा डोंगर उभारला आहे.

RCB vs PBKS : लियामची वादळी खेळी संपुष्टात

लियाम लिव्हिंगस्टोनने 42 चेंडूत 70 धावा केल्या असून अखेर हर्षलने त्याला तंबूत धाडलं आहे.

RCB vs PBKS : लियामचं अर्धशतक पूर्ण

जॉनी नंतर लियामनेही तुफान फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

RCB vs PBKS : हर्षलने घेतली हरप्रीत ब्रारची विकेट

हर्षल पटेलने हरप्रीत ब्रारला तंबूत धाडलं आहे.

RCB vs PBKS : जितेश शर्माही तंबूत परत

जितेश शर्माला वानिंदू हसरंगाने तंबूत धाडलं आहे. 

RCB vs PBKS : कर्णधारही बाद

पंजाबचा कर्णधार मयांक अगरवाल 19 धावा करुन बाद झाला आहे. हर्षल पटेलने त्याला बाद केलं आहे.

लिव्हिंगस्टोनची फटकेबाजी

लियाम लिव्हिंगस्टोन याने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेत फटकेबाजी सुरु केली आहे. लियाम सध्या 26 चेंडूत 40 धावांवर खेळत आहे. पंजाब तीन बाद 140 धावा

RCB vs PBKS : पंजाबला आणखी एक झटका

वानिंदू हसरंगाने भानुका राजपक्षाला स्वस्तात तंबूत धाडलं आहे.

RCB vs PBKS : बेअरस्टोचं तुफानी अर्धशतक

जॉनी बेअरस्टोने 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे.

RCB vs PBKS, Match Live Updates : पंजाबला पहिला धक्का, शिखर धवन बाद

मॅक्सवेलने पंजाबला दिला पहिला धक्का... शिखर धवन 21 धावांवर बाद झाला.. पंजाब एक बाद 60

RCB vs PBKS : विराट आणखी एका रेकॉर्डच्या जवळ

विराट कोहलीने आज एक झेल घेताच 150 टी20 कॅचेस पूर्ण करेल अशी कामगिरी करणारा तो तिसराच भारतीय असणार आहे.

RCB vs PBKS : पंजाब अंतिम 11 

जॉनी बेअरस्टो, मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), भानुका राजपक्षा, रिषी धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर

RCB vs PBKS : बंगळुरु अंतिम 11 

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.


 

RCB vs PBKS : आरसीबीने निवडली गोलंदाजी

नाणेफेक जिंकत बंगळुरु संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

RCB vs PBKS : आजवर रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स

आयपीएलमध्ये आजवर रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता पंजाबचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 16 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरुने 13 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. 

RCB vs PBKS : पंजाब संभाव्य अंतिम 11

जॉनी बेअरस्टो, मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), भानुका राजपक्षा, रिषी धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, संदीप शर्मा, राहुल चाहर

RCB vs PBKS : बंगळुरु संभाव्य अंतिम 11  

रजत पाटीदार, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), माहिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मोहम्मद सिराज


 

RCB vs PBKS : आज प्लेऑफमध्ये जाण्यासाठी महत्त्वाची लढत

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (RCB vs PBKS) या दोन्ही संघात सामना पार पडणार आहे. प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी दोघांना आजचा सामना महत्त्वाचा आहे.

पार्श्वभूमी

RCB vs PBKS, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आज रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स (RCB vs PBKS) या दोन संघात सामना पार पडत आहे. गुणतालिकेचा विचार करता  बंगळुरुने आतापर्यंत 12 पैकी 7 सामने जिंकत 14 गुणांसह चौथं स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे पंजाब संघाने 11 पैकी 5 सामने जिंकल्याने ते गुणतालिकेत आठव्या स्थानी आहेत. त्यामुळे आजचा विजय दोन्ही संघाना पुढील फेरीचं तिकीट मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा आहे. दोघांनाही आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा असल्याने आजचा सामनाही चुरशीचा होऊ शकतो. दरम्यान आयपीएलमध्ये आजवर रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता पंजाबचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 16 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बंगळुरुने 13 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. 


आजचा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी पार पडणाऱ्या सामन्यांमध्ये फलंदाजाना अधिक मदत मिळाल्याने एक मोठी धावसंख्या आजही उभी राहू शकते. दरम्यान आज पार पडणारा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते.


बंगळुरु  अंतिम 11


रजत पाटीदार, फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), माहिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवुड, मोहम्मद सिराज


पंजाब अंतिम 11  


जॉनी बेअरस्टो, मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), भानुका राजपक्षा, रिषी धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.