धारशिव : राज्यात महायुतीची सत्ता आली. मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय. आता छगन भुजबळ यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ऍक्टिव्ह झाल्याचं पहायला मिळत आहे. मराठवाड्यात गाव तिथे समता परिषदेची शाखा आणि घर तिथं समता सैनिक ही मोहीम समता परिषदेकडून राबविण्यात येत आहे. धाराशिव येथे समता परिषदेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष राऊत यांनी पुढील रणनीती पदाधिकार्यांना सांगितली. धाराशिव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 100 शाखांचे उद्घाटन करण्याचं यावेळी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याची तयारी छगन भुजबळांची समता परिषदेकडून सुरू असल्याचे चित्र आहे.
माळी समाजाच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांची मागणी
जातीनिहाय जनगणनेची मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करत आहोत. मात्र आमची वेळोवेळी फसवणूक झालेली आहे. मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही. मात्र ते आमच्यात आले तर आम्हालाही काही मिळणार नाही आणि त्यांनाही काही नाही. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करा नाहीतर आम्हाला 51% घोषित करा. अशी मागणी आज शेगाव येथील माळी समाजाच्या मेळाव्यात केली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली.
व्हीपी सिंहांच्या सांगण्यावरून ओबीसी समाजाची सेवा करतोय
छगन भुजबळ म्हणाले की, "अशा कार्यक्रला जाणे मी टाळतो. कारण समाज एक असला तरी पक्ष वेगळे असतात, विचारसरणी वेगळी असते. मी ओबीसींच्या प्रश्नावर शिबसेना सोडली. मी नरसिंह राव यांच्याकडे गेलो. त्यावेळी नरसिंह राव यांनी ओबीसी समाजाची सेवा करण्याचा सल्ला दिला होता. त्यातूनच समता परिषद स्थापन झाली. आदिवासी, दलित, ओपन आणि ओबीसी या चार वर्गात बाबासाहेबांनी समाजाला बांधलं. व्ही पी सिंहानी नंतर मंडळ आयोगासाठी काम केलं. त्यानंतर आपल्याला 30 टक्के आरक्षण मिळालं."
सावित्रीबाई फुलेंच्या शाळेत पहिल्या दिवशी सर्व ब्राह्मण मुली
टाटा, बिर्लांपेक्षा महात्मा फुलेंचं बॅलेन्स शीट मोठं होत. इतर देशात महिला पुढे आहेत, महिलांना आपल्याकडे शिक्षण मिळालं पाहिजे. सावित्री बाईंच्या शाळेत पहिल्या दिवशी सर्व ब्राह्मण मुली होत्या. त्यांनी त्यावेळी अत्याचारग्रस्त मुलींना दत्तक घेतलं, त्यांचा सांभाळ केला. माळी समाजाने शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्यासोबत काम केलं असं छगन भुजबळ म्हणाले.
हे ही वाचा