RCB vs CSK, Match Highlights : बंगळुरु संघाचा डाव आटोपला, चेन्नईला विजयासाठी 174 धावांची गरज
IPL : प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरु संघाने चेन्नईसमोर 174 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे.
RCB vs CSK : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 49 वा सामना रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपरकिंग्स (RCB vs CSK) या दोन्ही संघात पार पडत आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरु संघानेचेन्नईसमोर 174 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे. बंगळुरुकडून कोहली, फाफ यांनी उत्तम सुरुवात केल्यानंतर माहिपाल लोमरोरने केलेल्या तुफान खेळीनंतर अखेर दिनेशच्या फटकेबाजीमुळे ही धावसंख्या उभी राहिली आहे. चेन्नईकडून महेश तीक्ष्णाने उत्तम गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या.
सामन्यात नाणेफेक जिंकत चेन्नईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. त्यानंतर फाफने कोहलीसोबत सुरुवातही चांगली केली. अर्धशतकी भागिदारी झाल्यानंतर 38 धावांवर फाफ बाद झाला. त्यानंतर कोहलीही 30 धावांवर बाद झाला. रजतने 21 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, पण माहिपाल लोमरोरने ठोकलेल्या 42 तुफानी धावा संघासाठी महत्त्वाच्या ठरल्या. त्यानंतर अखेरच्या षटकात काही षटकार ठोकत दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) केलेल्या नाबाद 26 धावा संघाची धावसंख्या 173 पर्यंत नेण्यात महत्त्वाच्या ठरल्या. आता चेन्नईला विजयासाठी 120 चेंडूत 174 धावा करायच्या आहे.
मोईनचं पुनरागमन चेन्नईला फायद्याचं
आजच्या सामन्यात संघात पुनरागमन केलेल्या मोईन अलीने गोलंदाजीत तर उत्तम कामगिरी केली आहे. फाफ आण विराट या दोन्ही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे बंगळुरुचा डाव गडगडला. त्यात आता फलंदाजीतही मोईन कमाल कामगिरी करु शकतो. मोईन शिवाय चेन्नईकडून महेश तीक्ष्णाने उत्तम गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 27 धावा देत तीन विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-