IPL 2022: मुंबईच्या डी. वाय स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघानं आरसीबीला 5 विकेट्सनं परभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत पंजाबसमोर 206 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिलाय. 


नाणेफेक गमवल्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या संघाची आक्रमक सुरुवात केली. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि अनूज रावत यांनी पहिल्या विकेट्ससाठी 50 धावांची भागीदारी केली. त्यानंतर राहुल चाहरनं अनूज रावतच्या रुपात आरसीबीला पहिला झटका दिला. त्यानंतर डू प्लेसिसनं विराट कोहलीसोबत मिळून 118 धावांची केली. दरम्यान, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं आठराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसची विस्फोट खेळी संपुष्टात आणली.  त्यांतनंतर विराट कोहली आणि दिनेश कार्तिकनंही आक्रमक खेळी दाखवत संघाचा डाव 200 पार पाठवला. विराट कोहलीनं 29 चेंडूत 41 तर, दिनेश कार्तिकनं 14 चेंडूत 32 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.


या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीच्या संघाकडून मैदानात उतरलेल्या कर्णधार मयांक अग्रवाल आणि शिखर धवननं संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 71 धावांची भागेदारी केली. त्यानंतर वानिंदू हसरंगानं पंजाबच्या संघाला पहिला झटका दिला. मयांक अग्रवालनं 24 बॉलमध्ये 32 धावा केल्या. त्यानंतर भानूका राजापक्क्ष मैदानात आला. शिखर धवनसोबत मिळून त्यानं खेळ पुढे चालवला. दरम्यान, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर शिखर धवन झेलबाद झाला. शिखरपाठोपाठ राज बावाही शून्यावर बाद झाला. पंजाबनं हा सामना गमावला असं वाटत असताना शाहरूख खान आणि ओडियन स्मिथनं आक्रमक फलंदाजी करत सामना फिरवला. शाहरूख खाननं 20 बॉलमध्ये 24 तर, ओडियन स्मिथनं 8 बॉलमध्ये 25 धावा केल्या. ज्यामुळं पंजाबच्या संघाला 5 विकेट्स राखून आरसीबीवर विजय मिळवता आलाय. आरसीबीकडून मोहम्मद सिराजनं दोन विकेट्स मिळवल्या. तर, आकाश दिप, वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेलनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha