Sindhu wins Swiss Open : भारताची आघाडीची बॅडमिंटन खेळाडू पी व्ही सिंधू हिने इतिहास रचला आहे. सिंधूने रविवारी स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. सुपर 300 स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायनाने थायलंडच्या बुसानन ओंगरबामरंगफान हिचा फराभव केला. ऑलंपिक पदक विजेती सिंधूने अंतिम स्पर्धेत चैथ्या क्रमांकाच्या थायंलंडच्या खेळाडूला हरवलं. 49 मिनिटांमध्ये सिंधूने बुसानन ओंगरबामरंगफान हिचा पराभव केला. सिंधूने बुसानन ओंगरबामरंगफान हिच्यावर 21-16, 21-8 अशा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला.  सिंधूच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे. 






हैदराबादची 26 वर्षीय सिंधूने येथे 2019 मध्ये विश्व चॅम्पियनशिप स्पर्धत सुवर्णपदक पटकावले होते. सिंधूने जानेवारी 2022 मध्ये लखनौ येथे झालेल्या सैयद मोदी अंतरराष्ट्रीय सुपर 300 स्पर्धा जिंकली होती. सुपर 300 टूर्नामेंट बीडब्ल्यूएफ (विश्व बॅडमिंटन महासंघ) स्पर्धेत सिंधूने सुरुवातीपासून आपला दबदबा राखला होता. सुरुवातीला सिंधूने 3-0 ची आघाडी घेतली होती. पण बुसानन हिने पलटवार करत 7-7 ने बरोबरी केली होती. बुसनानने सिंधूला नेटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण सिंधूने आक्रमक सुरुवात करत पलटवार केला. मध्यतंरानंतर सिंधूने अधिक आक्रमक खेळ करत दोन अंकाची आघाडी घेतली.  बॅकलाइनजवळ शानदार शॉट खेळत सिंधूने चार गुणांचा कमाई केली. सिंधूने पहिला सेट जिंकत बुसाननवर दबाव निर्माण केला होता. त्यानंतर सिंधूने दुसरा सेट सहज जिंकला अन् स्पर्धा नावावर केली.  


बुसानन ओंगरबामरंगफान हिच्याविरोधात सिंधूची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. या दोघींमध्ये आतापर्यंत 17 सामने झाले आहेत. यामध्ये सिंधूने 16 सामन्यात विजय मिळवला आहे. फक्त एका सामन्यात बुसानन ओंगरबामरंगफान हिला विजय मिळवता आला आहे. 2019 हाँगकाँग ओपनमध्ये बुसानन ओंगरबामरंगफान हिने सिंधूचा पराभव केला होता. या सामन्याचा अपवाद वगळता सिंधूने बुसानन ओंगरबामरंगफानचा प्रत्येक सामन्यात पराभव केला आहे.