IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हगामची सुरुवात झालीय. या हंगामातील पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता (CSK Vs KKR) यांच्यात रंगला. या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) विक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यात तीन विकेट्स घेऊन ब्राव्होनं श्रीलंकेचा माजी खेळाडू मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. 


लसिथ मलिंगाचा विक्रम मोडण्याची संधी
 ब्राव्होने कोलकाताविरुद्ध सामन्यात 4 षटकात  20 धावा देऊन तीन विकेट्स घेतले. त्यानं व्यंकटेश अय्यर, नितीश राणा आणि सॅम बिलिंग्स यांना बाद केलं. बिलिंग्सची विकेट घेतल्यानंतर ब्राव्हो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आला आहे. त्यानं मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची बरोबरी केली. दोघांनीही आपीएलच्या कारकिर्दीत प्रत्येकी 170-170 विकेट घेतल्या आहेत.


ब्राव्होचं 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण
ब्राव्होनं 2008 मध्ये मुंबईच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.ब्रोव्होनं आतापर्यंत तीन संघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 152 सामने खेळले आहेत. या सामन्यात  17.28 च्या सरासरीनं त्यानं 170 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या पहिल्या तीन हंगामात मुंबईकडून खेळल्यानंतर ब्रोव्हो चेन्नईमध्ये सामील झाला. तेव्हापासून तो चेन्नईचा भाग आहे. 2016 मध्ये तो गुजरात लायन्सचा भाग होता. त्याने 2013 आणि 2015 मध्ये पर्पल कॅपही जिंकली होती. आता पुढच्या सामन्यात त्याला लसिथ मलिंगाला मागे टाकण्याची संधी असेल.


आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
लसिथ मलिगानं 2019 मध्ये आयपीएलचा शेवटचा सामना खेळला होता. त्यानं आयपीएलमध्ये एकूण 122 सामने खेळले आहेत. मुंबईकडून खेळताना त्यानं  19.79 च्या सरासरीने आणि 16.63 च्या इकॉनॉमीने 170 विकेट घेतल्या. या यादीत भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 166 विकेट्स नोंद आहे. त्यानंतरपियुष चावला 157 विकेट्ससह चौथ्या आणि हरभजन सिंह 150 विकेटसह 5व्या क्रमांकावर आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha