IPL 2022: मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीअमवर पंजाब आणि बंगळुरू यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील तिसरा सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या संघानं पंजाबसमोर 20 षटकात 2 विकेट्स गमावून 206 धावांचं लक्ष्य ठेवलंय. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं विस्फोटक फलंदाजी केलीय. त्यानं 57 चेंडूत 88 धावा केल्या आहेत. ज्यात सात षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. याशिवाय, आरसीबीचा माजी कर्णधार आणि दिनेश कार्तिक यांनीही आक्रमक खेळी दाखवलीय.


नाणेफेक गमवल्यानंतर मैदानात आलेल्या आरसीबीच्या संघाची आक्रमक सुरुवात केली. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि अनूज रावत यांनी पहिल्या विकेट्ससाठी 50 धावांची भागीदारी केली. त्यानंतर राहुल चाहरनं अनूज रावतच्या रुपात आरसीबीला पहिला झटका दिला. त्यानंतर डू प्लेसिसनं विराट कोहलीसोबत मिळून 118 धावांची केली. दरम्यान, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं आठराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसची विस्फोट खेळी संपुष्टात आणली.  त्यांतनंतर विराट कोहली आणि दिनेश कार्तिकनंही आक्रमक खेळी दाखवत संघाचा डाव 200 पार पाठवला. विराट कोहलीनं 29 चेंडूत 41 तर, दिनेश कार्तिकनं 14 चेंडूत 32 धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली. 


संघ-


मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षे (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, संदीप शर्मा, राहुल चहर.


फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha