PBKS vs SRH, Match Live Update : हैदराबादचा पंजाबवर विजय, सात गडी राखून दिली मात

IPL 2022 : आज नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडणार आहे. दोन्ही संघानी आतापर्यंत प्रत्येकी तीन विजय मिळवले आहेत.

abp majha web team Last Updated: 17 Apr 2022 07:12 PM
PBKS vs SRH : हैदराबादचा सात गडी राखून विजय

मार्करम आणि पूरनच्या उत्कृष्ट भागिदारीमुळे हैदराबादने पंजाबवर सात गडी राखून विजय मिळवला आहे.

PBKS vs SRH : हैदराबादला विजयासाठी 4 षटकात 31 धावांची गरज

सामन्यातील अखेरची चार षटकं शिल्लक असून हैदराबादला विजयासाठी 31 धावांची गरज आहे. त्यांच्या हातात सात विकेट्ही आहेत. 

PBKS vs SRH : अभिषेक शर्मा बाद

हैदराबादकडून सेट झालेला फलंदाज अभिषेक शर्मा 31 धावा करुन तंबूत परतला आहे. राहुल चाहरने त्याला बाद केलं आहे.

PBKS vs SRH : 10 षटकानंतर हैदराबाद 74/2

10 षटकानंतर हैदराबादने 74 धावांपर्यंत मजल मारली असून त्यांनी दोन विकेट्स गमावल्या आहेत. सघ्या मार्करम आणि अभिशेक फलंदाजी करत आहेत.

PBKS vs SRH : पंजाबला मोठं यश, राहुल त्रिपाठी बाद

हैदराबादकडून चांगली फलंदाजी करत असणाऱ्या राहुल त्रिपाठीची विकेट पडली आहे. 34 धावा करुन तो बाद झाला आहे. राहुलने त्याला बाद केलं आहे.

PBKS vs SRH : कर्णधार केन बाद

हैदराबादला पहिला झटका बसला असून कर्णधार केन तंबूत परतला आहे. रबाडाने विकेट टीपली आहे.

PBKS vs SRH : पंजाबला विजयासाठी 152 धावांची गरज

हैदराबादने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाब केवळ 151 धावा केल्या आहेत. त्यामुळे पंजाबला 152 धावांची गरज आहे.

PBKS vs SRH: अखेरच्या षटकात उम्रानची चमकदार कामगिरी

अखेरच्या षटकात हैदराबादच्या उम्रान मलिकने दमदार कामगिरी करत तीन विकेट्स घेतले आहेत.

PBKS vs SRH : शाहरुख खान आऊट

26 धावा करुन पंजाबचा फलंदाज शाहरुख खान बाद झाला आहे. भुवनेश्वरच्या चेंडूवर कर्णधार केनने त्याची विकेट घेतली आहे.

PKBS Vs SRH: लियाम लिव्हिंगस्टोन अर्धशतकी खेळी

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जचा तडाखेबाज फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोननं अर्धशतक केलंय. 

IPL 2022: पंजाबनं चौथी विकेट्स गमावली, जितेश शर्मा 11 धावा करून बाद

पंजाबच्या संघानं जितेश शर्माच्या रुपात चौथी विकेट्स गमावली आहे. त्यानं 8 चेंडूत 11 धावा केल्या आहेत. 

PBKS vs SRH : पंजाबचा तिसरा गडीही बाद

जॉनी बेअरस्टो जगदीश सुचिथच्या चेंडूवर पायचीत झाला आहे.

PBKS vs SRH : पंजाबला दुसरा झटका

पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंहला टी. नटराजनने बाद केलं आहे.

PBKS vs SRH : शिखर धवन तंबूत परत

आजच्या सामन्यात कर्णधाराच्या भूमीत असणारा शिखर 8 धावा करुन तंबूत परतला आहे. भुवनेश्वरने त्याला बाद केलं आहे.

PBKS vs SRH : पंजाबच्या कर्णधार मयांक सामन्याला मुकणार

पंजाब संघाचा कर्णधार मयांक अगरवालच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे आज तो सामना खेळू शकणार नसल्याची माहिती शिखर धवनने दिली असून शिखर आज पंजाबचा कर्णधार असेल.  

PBKS vs SRH : हैदराबाद अंतिम 11  

अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार) निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्करम, शशांक सिंह, जगदीशा सुचित, मार्को जेन्सन, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी नटराजन 

PBKS vs SRH : पंजाब अंतिम 11  

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टोव्ह, प्रभसिमरन सिंह, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, वैभव अरोरा, राहुल चाहर


 

PBKS vs SRH : हैदराबादने जिंकली नाणेफेक, निवडली गोलंदाजी

हैदराबाद संघाने नुकतीच नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

हैदराबाद संभाव्य अंतिम 11

अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार) निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्करम, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समाद, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी नटराजन 


 

पंजाब संभाव्य अंतिम 11

मयांक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, भानुका राजपक्षा (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, संदीप शर्मा, राहुल चाहर


 

PBKS vs SRH : कोण मारणार बाजी?

आज पार पडणाऱ्या पंजाब विरुद्ध हैदराबाद या दोन्ही संघानी यंदाच्या हंगामात आतापर्यंत समसमान कामगिरी केली असल्याने आजचा सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे.


 

पार्श्वभूमी

PBKS vs SRH, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 28 वा सामना पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद (PBKS vs SRH) या दोन संघामध्ये पार पडत आहे. दोन्ही संघानी यंदाच्या हंगामात आतापर्यंत समसमान कामगिरी केली असल्याने आजचा सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे.


आयपीएलमध्ये आजवर पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद बंगळुरु (PBKS vs SRH) हे संघ तब्बल 17 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता हैदराबादचं पारडं जड राहिलं आहे. त्यांनी 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाबने केवळ 5 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. 


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजचा सामना दुपारच्या वेळेत होणार आहे, त्यामुळे उष्णता अधिक असल्याने दवाची अडचण अधिक होणार नाही. दवाची अडचण नसल्याने नाणेफेक आजच्या सामन्यात मोठा प्रभाव पाडणार नसल्याचं ही तज्ज्ञांचं मत आहे.


पंजाब अंतिम 11  


शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टोव्ह, प्रभसिमरन सिंह, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, वैभव अरोरा, राहुल चाहर


हैदराबाद अंतिम 11  


अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन (कर्णधार) निकोलस पूरन (विकेटकीपर), एडन मार्करम, शशांक सिंह, जगदीशा सुचित, मार्को जेन्सन, भुवनेश्वर कुमार, उम्रान मलिक, टी नटराजन 


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.