IPL 2022 Mega Auction: आयपीएल 2022  मेगा ऑक्शनची (IPL 2022 Mega Auction) क्रिकेट चाहत्यांना कमालीची उत्सुकता लागलीय. हळूहळू या ऑक्शनशी संबंधित माहिती समोर येत आहे. आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघाचा समावेश झालाय. या हंगामात यावर्षी 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. यामुळं यंदाचा हंगाम प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहे. यातच भारताचा तडाखेबाज फलंदाज शिखर धवनला खरेदी करण्यासाठी मुंबई, कोलकाता, राजस्थान, बंगळुरू आणि लखनऊचा संघ मेगा ऑक्शनमध्ये पाऊस पाडण्याची शक्यता आहे. 


शिखर धवननं आयपीएलच्या मागील काही हंगामात दिल्लीच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. मात्र, या हंगामाच्या मेगा ऑक्शनपूर्वी दिल्ल्लीच्या संघानं शिखर धवनला रिलीज केलंय. याचं दिल्लीच्या संघाला मोठं दु:ख झालं असेल. शिखर धवन निळ्या जर्सीमध्ये मैदान गाजवत आहे. शिखर धवन फॉर्ममध्ये आल्यामुळं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये त्याला खरेदी करण्यासाठी मुंबई, कोलकाता, राजस्थान, बंगळुरू आणि लखनऊचा संघ मेगा ऑक्शनमध्ये पाऊस पाडण्याची शक्यता आहे. 


आयपीएलमध्ये शिखर धवननं आतापर्यंत एकूण 192 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 5 हजार 784 धावा केल्या आहेत. धवन 2019मध्ये दिल्लीच्या संघात सामील झाला होता. परंतु. या हंगामातील ऑक्शनपूर्वी त्याला दिल्लीच्या संघानं रिलीज केलंय. धवननं आयपीएलमध्ये 2009-10 दरम्यान मुंबईच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. धवनचा फॉर्म पाहता त्याला खरेदी करण्यासाठी मेगा ऑक्शनमध्ये मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha