IPL 2022 Player Retention : लखनौ आणि अहमदाबाद या दोन आयपीएलमधील नवीन संघानी आगामी लिलावापूर्वी घेतलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. लखनौ संघाने राहुल, स्टॉयनिस आणि बिश्नोई यांना करारबद्ध केलं. तर अहमदाबाद संघाने अष्टपैलू हार्दिक पंड्या, फिरकीपटू राशिद खान आणि शुभमन गिल या तीन खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. दरम्यान या सर्व सहा खेळाडूंना त्यांचे जुने संघ सोडावे लागल्याने त्यांचे फॅन्सही भावूक झाले आहेत. मुंबई इंडियन्सने हार्दीकबाबतची एक पोस्ट शेअर केली होती. तर शुभमनने स्वत: केकेआरमधील आठवणींना उजाळा देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला शुभमनने एक कॅप्शनही दिलं आहे. त्याने केकेआर एका स्वप्नासारखं होतं असं लिहिलं आहे.



अहमदाबाद संघाने हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद सोपवलं असून त्यांनी हार्दिक पंड्या आणि राशिद खान यांना प्रत्येकी 15-15 कोटी रुपये दिले आहेत. तर शुभमन गिल याला आठ कोटी रुपयांत करारबद्ध केलं आहे. तीन खेळाडूंसाठी अहमदाबाद संघाने 38 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे या संघाकडे आता 52 कोटी रुपये शिल्लक आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे.  


केकेआर आणि शुभमन गिल


2018 साली भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला होता, त्या संघाचा हिस्सा असणाऱ्या शुभमनला विश्वचषकानंतर केकेआरने 1.8 कोटी रुपयांना विकत घेतलं. गिलने  आतापर्यंत 58 आयपीएल सामने खेळले असून 1 हजार 417 रन केले आहेत. 2019 मध्ये त्याला आयपीएल इमरजिंग प्लेयर ऑफ द इयरचा खिताबही मिळाला आहे


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha