IND Vs SA, 3rd ODI LIVE:दक्षिण आफ्रिकेचा 'क्लीन स्वीप', रोमांचक सामन्यात भारताचा 4 धावांनी पराभव

India Vs South Africa 3rd ODI: भारत विरुद्ध दक्षिण यांच्यात आज तिसरा एकदिवसीय मालिका खेळला जात आहे. या सामन्याचे प्रत्येक अपडेट्स पाहा...

abp majha web team Last Updated: 23 Jan 2022 10:24 PM
दक्षिण आफ्रिकेचा 'क्लीन स्वीप', रोमांचक सामन्यात भारताचा 4 धावांनी पराभव

रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने चार धावांनी विजय संपादन केला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघाने भारताला  'क्लीन स्वीप' दिला आहे. तीन सामन्याची एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिका संघाने ३-० च्या फरकाने जिंकली. दीपक चहरने ६९ धावांची खेळी केली.

भारत चार धावांनी पराभूत, मालिका 3-0 ने गमावली

आफ्रिकेचं 288 धावांचं लक्ष भारत पूर्ण न करु शकल्याने चार धावांनी सामना आणि 3-0 ने मालिका भारताने गमावली आहे.

अखेरच्या 6 चेंडूत भारताला 6 धावांची गरज

अखेरची ओव्हर शिल्लक असून भारताला आणखी सहा धावांची गरज आहे. तर आफ्रिकेला केवळ एक विकेट घ्यायची आहे.

बुमराह बाद, भारताचे नऊ गडी बाद

भारताला विजयासाठी अजून 7 धावांची गरज आहे. तर आफ्रिकेला केवळ एक विकेट घ्यायची आहे.

दीपक बाद, भारताला विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज

सामना विजयाच्या जवळ आणून ठेवलेला दीपक अखेर झेलबाद झाला आहे. भारताला विजयासाठी अजूनही 10 धावांची गरद आहे. 

दीपकने सांभाळला भारताचा डाव, अर्धशतकही केलं पूर्ण

एकापाठी एक फलंदाज बाद होत असताना पुन्हा एकदा दीपकनं भारताचा जाव सांभाळला आहे. त्याने अर्धशतक पूर्ण केलं असून तो संघाला विजयाजवळ नेत आहे.

भारताला सातवा झटका, जयंत यादव बाद

भारताचा सातवा गडी जयंत यादवही तंबूत परतला आहे. आता दीपक चाहर आणि बुमराह क्रिजवर असून विजयासाठी भारताला पाच ओव्हरमध्ये 35 धावांची गरज आहे.

सूर्यकुमार यादवही बाद, भारताची परिस्थिती कठीण

सूर्यकुमार यादव 39 धावा करुन तंबूत परतला आहे. त्यामुळे आता दीपक चाहर आणि जयंत यादव हे दोघे क्रिजवर असून अजूनही भारताला 54 चेंडूत 69 धावांची गरज आहे.

श्रेयस अय्यर बाद, निम्मा संघ तंबूत परत

भारताला आता 77 चेंडूत 93 धावांची गरज असून श्रेयस अय्यर बाद झाल्यामुळे भारताला मोठा झटका बसला आहे. आता सूर्यकुमारसोबत दीपक चाहर क्रिजवर आहे.

कोहली आजही शतकापर्यंत पोहचण्यात अयशस्वी, 65 धावा करुन बाद

चांगल्या लयीत असणारा विराट कोहली आज 65 धावा करुन अखेर तंबूत परतला आहे. केशव महाराजनेच त्याला बाद केलं आहे.

विराटसह श्रेयस अय्यर क्रिजवर, भारताची धावसंख्या 150 पार

भारताचा स्टार फलंदाज किंग कोहलीने अर्धशतक पूर्ण केलं असून सध्या त्याच्या जोडीला श्रेयस अय्यर क्रिजवर आहे. भारताने तीन गडी गमावत 150 धावा केल्या असून विजयासाठी भारताला 138 धावांची गरज आहे.

कोहली आणि धवननं संघाचा डाव सावरला

भारताचा सलामीवीर केएल राहुल बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीनं संघाचा डाव सावरला आहे. 

भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं 288 धावांच आव्हान

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतासमोर 288 धावांचं लक्ष्य दिलंय. 

दक्षिण आफ्रिकेला आणखी एक झटका, निम्मा संघ तंबूत

चहलने ड्युसेन याला बाद केलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे पाच गडी आतापर्यंत तंबूत परतले आहेत.

बुमराहने मिळवून दिलं चौथं यश, डी कॉक बाद

अप्रतिम शतक झळकावणाऱ्या डी कॉक याला जसप्रीत बुमराहने तंबूत धाडलं आहे. डी कॉक 124 धावा करुन बाद झाला आहे. आफ्रिकेचे 4 गडी आतापर्यंत तंबूत परतले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला, धावसंख्या 200 पार

पहिल्या तीन विकेट पटापट गेल्यानंतर डी कॉक आणि ड्युसेन यांनी आफ्रिकेचा डाव सावरला आहे. डी कॉकने शतक तर ड्युसेनने अर्धशतक पूर्ण केलं असून आफ्रिकेची धावसंख्या 200 पार गेली आहे.

आफ्रिकेच्या डी कॉकचं अर्धशतक पूर्ण

आफ्रिकेचे तीन फलंदाज भारतीय गोलंदाजांनी तंबूत धाडल्यानंतर डी कॉकने डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं असून आफ्रिकेची स्थिती 93/3 बाद अशी आहे.

मारक्रम 15 धावांवर बाद, चहरनं घेतली दुसरी विकेट

मारक्रम 15 धावांवर बाद, चहरनं घेतली दुसरी विकेट

10 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या 2 विकेट्सवर 53 धावा, डी कॉकची सावध खेळी

10 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या 2 विकेट्सवर 53 धावा, डी कॉकची सावध खेळी

34 धावांत आफ्रिकेने 2 फलंदाज गमावले

क्विंटन डी कॉक आणि जानेमन मलान यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात केली. मागील सामन्यात दमदार अर्धशतक ठोकलेल्या मलानला या सामन्यात फार काही करता आले नाही. वेगवान गोलंदाज दीपक चहरने त्याला (1)  बाद केले. तर त्यानंतर आलेला कप्तान टेंबा बावुमा (८) राहुलकडून धावबाद झाला. चोरटी धाव घेणे बावुमाला अंगउलट आले. 34 धावांत आफ्रिकेने 2 फलंदाज गमावले.

केएल राहुलचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

मधल्या षटकांमध्ये फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही, तर जसप्रीम बुमराह वगळता उर्वरित भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आणि त्यांची गोलंदाजी एकदम साधारण दिसली. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांना केवळ सात विकेट घेता आल्या. केपटाऊनच्या मैदानावर आज भारताचा कप्तान केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची रणनीती पूर्णपणे अपयशी

पहिले दोन सामने गमावल्यानंतर आता क्लीन स्वीप टाळण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत आमनेसामने आला आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली. 

पार्श्वभूमी

IND vs SA 3rd ODI : भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत (One Day Series) भारताचा दोन सामन्यात पराभव झाला आहे.   आज होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्लीन स्वीप टाळणं आवश्यक आहे. 


पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची रणनीती पूर्णपणे फसल्याने संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मधल्या षटकांमध्ये फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही तर जसप्रीम बुमराह वगळता उर्वरित भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांना केवळ सात गडी बाद करता आले. बुमराहने पहिल्या सामन्यात चार तर दुसऱ्या सामन्यात तीन गडी बाद केले. 
दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार सारखे अनुभवी गोलंदाज अपयशी ठरले आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यामुळे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पुढील आजच्या संघात काही बदल करू शकतात.  


संघ-


भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, दीपक चहर, सूर्यकुमार यादव, , नवदीप सैनी, इशान किशन, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, रुतुराज गायकवाड


दक्षिण आफ्रिका संघ: क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), जेनेमन मलान, टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, सिसांडा मगला, झुबेर हमझा, काइल वेरेन


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.