LSG vs DC, Match Live Updates : लखनौच्या संघाचा विजय, दिल्लीचा 6 विकेट्सनं पराभव
नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC) या दोघांमध्ये चुरशीची लढत रंगत आहे.
दिल्लीविरुद्ध नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीलएलच्या पंधराव्या सामन्यात लखनौनं विजय मिळवला आहे. या सामन्यात क्विंटन डी कॉकनं दमदार अर्धशतकी खेळी केली.
दिल्लीविरुद्ध सामन्यात लखनौचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. लखनौच्या संघाला 30 चेंडूत 39 धावांची गरज आहे.
दिल्लीविरुद्ध सामन्यात लखौनचा सलामीवीर क्विंटन डी कॉकनं अर्धशतक केलं आहे. दरम्यान, लखनौच्या संघाला विजयासाठी 42 चेंडूत 60 धावांची गरज आहे.
क्विंटनने पाचव्या षटकात 3 चौकार आणि एक षटकार ठोकत नॉर्खियाला 19 धावा ठोकल्या आहेत.
लखनौने 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संयमी सुरुवात केली आहे. 5 षटकानंतर त्यांचा स्कोर 45 आहे.
150 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी लखनौकडून सलामीवीर केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक मैदानात उतरले आहेत.
लखनौने कसून गोलंदाजी केल्याने दिल्लीचा संघ केवळ 149 धावाच करु शकला आहे. ज्यामुळे लखनौला विजयासाठी 150 धावांची गरज आहे.
ऋषभ पंत आणि सरफराज खान यांनी क्रिजवर टिकून राहून खेळी केली आहे. पण 19 षटकानंतर दिल्ली 142 धावाच करु शकली आहे.
ऋषभ पंत आणि सरफराज खान यांनी संयमी खेळी केली आहे. त्यामुळे 17 ओव्हरनंतर दिल्लीचा स्कोर 130 वर 3 बाद आहे.
रवी बिश्नोईने रोवमॅन पोवेलला त्रिफळाचित केलं आहे. पोवेल 3 धावा करुन तंबूत परतला आहे.
तुफान फटकेबाजी केल्यानंतर पृथ्वी शॉ के गौथमच्या चेंडूवर झेलबाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात रवी बिश्नोईने वॉर्नरलाही तंबूत धाडलं आहे.
पृथ्वी शॉने दमदार फटकेबाजी करत 30 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे.
सलामीवीर पृथ्वी शॉ तुफान फटकेबाजी करत असून चौकारांमागे चौकार ठोकत आहे. 17 चेंडूत त्याने 35 धावा केल्या आहेत.
दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ मैदानात आले आहेत.
लखनौने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे. दवाच्या समस्येमुळेच लखनौ आधी गोलंदाजी करणार असून कारण दुसऱ्यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवामुळे अडचण येत असल्याचं समोर येत आहे.
लखनौ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज झाले आहेत. खेळाडूही कसून सराव करत आहेत.
आज आयपीएलमधील 15 वा सामना लखनौ आणि दिल्ली या संघात पार पडणार आहे. लखनौची मदार केएल राहुलवर तर दिल्लीचं नेतृत्त्व पंत करत आहे.
पार्श्वभूमी
LSG vs DC, Live Updates : आयपीएलमधील (IPL 2022) आजचा 15 वा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC) या दोघांमध्ये पार पडत आहे. दोन्ही संघानी यंदाच्या हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी केल्याने आजचा सामना चुरशीचा होईल अशी आशा सर्वांनाच आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात आले असल्याने आज दोन्ही संघातील ऑस्ट्रेलियन खेळाडूंना संधी मिळेल अशी आशा आहे. दरम्यान डेव्हिड वॉर्नर दिल्लीकडून मैदानात उतरेल हे जवळपास निश्चित असून स्टॉयनिस मात्र अजून लखनौकडून मैदानात उतरण्यासाठी सज्ज नसल्याचं दिसून येत आहे.
कसा आहे पिच रिपोर्ट?
सामना पार पडणाऱ्या डी.वाय. पाटील मैदानाची खेळपट्टी पाहता आतापर्यंत होत असल्याप्रमाणे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची दाट शक्यता आहे. कारण सायंकाळच्या सुमारास दव पडल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला अडचण येऊ शकते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच प्रथम गोलंदाजी घेऊ इच्छित असणार आहे.
लखनौ अंतिम 11
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृष्णप्पा गौथम, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, अॅन्ड्रू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान
दिल्ली अंतिम 11
पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), सरफराज खान, ललित यादव, रोवमेन पोवेल, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, मुस्तफिजूर रेहमान.
हे देखील वाचा-
- IPL 2022, RR vs RCB : आज रंगणार बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामना, कधी, कुठे पाहाल सामना?
- RR vs RCB : राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामन्यात होऊ शकतात मोठे बदल, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
- Womens World Cup 2022 : आयसीसीने निवडली महिला विश्वचषकातील बेस्ट 11, एकाही भारतीय खेळाडूला संधी नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -