Gold Silver Price : सोनं चांदी (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या वाढत्या दरामुळं सोने खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला अधिकची झळ बसत आहे. दरम्यान, या वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करावी की नको असा प्रश्न निर्माण होत आहे. जाणून घेऊयात सोन्या चांदीच्या दरात नेमकी किती झाली वाढ?


 सोन्या चांदीच्या दरात किती झाली वाढ?


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात 152 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर हा सरासरी 76460 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर दुसऱ्या बाजुला चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 1389 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं आज चांदीचे दर 90000 रुपयांवर गेले आहेत. 


दिल्लीत सोन्या चांदीचा दर काय


दरम्यान, दिल्लीच्या सराफा बाजारात देखी ससोन्याचे दर वाढले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 77513 रुपये मोजावे लागत आहेत. तर चांदीचा दर हा 94000 रुपयांवर गेला आहे. 


चेन्नईत सोन्या चांदीचा दर काय?


चेन्नईत देखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. चेन्नईत 10 ग्रॅम सोन्यासाठी 77361 रुपये मोजावे लागत आहेत. तर चेन्नईत चांदीच्या दरानं लाखाचा टप्पा गाठला आहे. चेन्नईत चांदी 1 लाख 2 हजार रुपयांवर पोहोचली आहे. 


मुंबईत सोन्या चांदीचा दर काय


मुंबईत देखील सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत  10 ग्रॅम सोन्यासाठी 77367 रुपये मोजावे लागत आहेत. तर मुंबईत चांदीचे दर 93000 रुपयांवर पोहोचले आहेत. 


कोलकातामध्ये सोन्या चांदीचा दर काय? 


कोलकातामध्ये  देखील सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. कोलकातामध्ये 10 ग्रॅम सोन्यासाठी 78025 रुपये मोजावे लागत आहेत. तर कोलकातामध्ये चांदीचे दर 94800 रुपयांवर पोहोचले आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ


गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, अखेर काल सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर चांगलाच ताण पडत असल्याचं पाहायला मिळत आहे.  


महत्वाच्या बातम्या:


सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, कोणत्या शहरात किती दर?