Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 651अग्नीवीर जवानांचा शानदार दीक्षांत आणि शपथविधी सोहळा बेळगावातील मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर येथे पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्नीविरानी तिरंगा ध्वज, रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने शपथ घेतली. अग्नीविरानी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
अग्नीवीर अतुल लहाने आणि मेजर संदीप कुमार यांनी परेडचे नेतृत्व केले.
यावेळी मिलिटरी बँडने देशभक्तीपर धून सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
प्रशिक्षण कालावधीत बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल साहिल शिंदे याला उत्कृष्ट अग्नीवीर पुरस्कार ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दीक्षांत समारंभ झाल्यावर युद्ध स्मारक येथे युद्धात शहीद झालेल्या शहिदांना मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
दीक्षांत समारंभाला मराठाचे लाईट इन्फंट्री रेजिमेंटचे अधिकारी, वायू दलाचे अधिकारी, निवृत्त अधिकारी आणि अग्नीवीर कुटुंबीय उपस्थित होते.
बेळगावच्या मराठा लाईट इन्फट्रीला शौर्याचा वारसा लाभला असून जगभरात अनेक ठिकाणी झालेल्या युध्दात मराठा लाईट इन्फट्रीने विजय प्राप्त केला आहे. भारतीय लष्करातील सर्वात जुन्या रेजिमेंट पैकी एक रेजिमेंट अशी मराठा लाईट इन्फट्रीची ओळख आहे. 1768 मध्ये मराठा लाईट इन्फट्रीची स्थापना झाली.