Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समुहातील अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेडमध्ये आज 95 रुपयांपर्यंतची तेजी पाहायला मिळाली. 1310 रुपयांवर जाऊन शेअर नंतर घसरला. सध्या अदानी पोर्टसचा शेअर 1291 रुपयांवर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं गुंतवणूकदारांना अदानी पोर्ट्सचा शेअर 1960 रुपयांच्या टारगेटसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला होता.
अदानी पोर्टसनं स्टॉक्स एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2024 मध्ये कंपनीनं 36 दशलक्ष टन कार्गो हाताळलं आहे. जे गेल्या वर्षीपेक्षा 21 टक्के जास्त आहे. कंपनीनं नोव्हेंबर महिन्यापर्यंत 293.7 मिलियन टन कार्गो हँडल केला आहे.
आज अदानी पोर्टसचा शेअर बाजार सुरु होत असताना 1225 रुपयांवरुन वाढून 1310 रुपयांपर्यंत पोहोचला होता. या आकडेवारीनुसार अदानी पोर्ट्सचं बाजारमूल्य 2.83 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं होतं. कंपनीचं बाजारमूल्य 20 हजार कोटींनी वाढलं होतं. त्यानंतर त्यामध्ये थोडी घसरण झाली.
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं अदानी पोर्ट्सचा शेअर 1960 रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच सध्या अदानी पोर्टसचा शेअर 1290 रुपये असून तो जवळपास 50 टक्के परतावा देऊ शकतो. कोटक इन्स्टीट्यूशनल इक्विटीजनं 1630 रुपये आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेसनं 1530 रुपयांचा अंदाज व्र्तवला आहे.