LSG signs Andrew Tye: आयपीएलच्या आगामी पंधराव्या हंगामाला सुरू होण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असताना अजूनही काही नवीन अपडेट येत आहेत. काही दिवसांपूर्वी लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळं स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती मिळाली होती. आता त्याच्या जागी एका ऑस्ट्रेलियन दमदार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे. हा खेळाडू म्हणजे अष्टपैलू अॅन्ड्रू टाय (Andrew Tye).


वुडला वेस्ट इंडीजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने लखनौ फ्रँचायझीला वुडच्या दुखापतीबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर आता त्यांनी वुडची रिप्लेसमेंट म्हणून टायला संघात घेतलं आहे. टायने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी 32 सामन्यात 47 विकेट्स घेतल्या आहेत. तर आयपीएलमध्ये 27 सामन्यात 40 विकेट्स घेतल्या आहेत.



लखनौ सुपर जायंटसचे शिलेदार- 


लोकेश राहुल (17 कोटी), मार्कस स्टॉईनिस (9.2 कोटी), रवी बिष्णोई (4 कोटी), क्विन्टॉन डी कॉक (6.75 कोटी), मनिष पांडे (4.60 कोटी), जेसन होल्डर (8.75 कोटी), दीपक हूडा (5.75 कोटी), कृणाल पंड्या (8.25 कोटी), मार्क वूड (7.50 कोटी), आवेश खान (10 कोटी), अंकित राजपूत (50 लाख), के. गौतम (90 लाख), दुष्मन्ता चमिरा (2 कोटी), शाहबाज नदीम (50 लाख), मनन व्होरा (20 लाख), मोहसीन खान (20 लाख), आयुष बदोनी (20 लाख), करण शर्मा (20 लाख).     


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha