Rohit Sharma Dance : रोहित शर्मा आगामी आयपीएलसाठी पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सची कमान सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. पण सामन्यांपूर्वी रिलॅक्स करण्याकरता रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्ससोबतच्या शूट्सदरम्यान मजा-मस्ती करत आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये तो शूटदरम्यान मुलगी समायरासोबत डान्स करताना दिसत आहे.

शूट दरम्यानचा डान्सचा हा व्हिडीओ शेअर करताना रोहितने लिहिलं आहे की,'कॅम्पेनचा तो भाग जो तुम्ही पाहू शकत नाही.' या व्हिडीओमध्ये रोहित जरा हटके अंदाजात दिसत आहे. अनेकदा शांत स्वभावात दिसणारा रोहित या शूटदरम्यान अगदी मस्त मूडमध्ये धमाल करत आहे. 

मुंबई इंडियन्स IPL 2022

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबईचा पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेच्या लीग सामन्यात प्रत्येक संघ 14 सामने खेळणार असून मुंबईचे प्रत्येकी दोन सामने कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ आणि चेन्नई या संघाविरोधात होणार आहेत. तर हैदराबाद, आरसीबी, पंजाब आणि गुजरात यांच्याविरोधात एक एक सामना होणार आहे. तर नेमका कधी कोणाबरोबर सामना आहे हे पाहुया...

सामना कधी कुठे कुणाबरोबर किती वाजता
पहिला  रविवार, 27 मार्च ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई दिल्ली कॅपिटल्स दुपारी 3.30 वाजता
दुसरा शनिवार, 2 एप्रिल डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई राजस्थान रॉयल्स दुपारी 3.30 वाजता
तिसरा बुधवार, 6 एप्रिल एमसीए स्टेडियम, पुणे कोलकाता नाईट रायडर्स सायंकाळी 7.30 वाजता
चौथा शनिवार, 9 एप्रिल एमसीए स्टेडियम, पुणे रॉयल चॅलेजर्स बंगळुरु सायंकाळी 7.30 वाजता
पाचवा बुधवार, 13 एप्रिल एमसीए स्टेडियम, पुणे पंजाब किंग्स सायंकाळी 7.30 वाजता
सहावा शनिवार, 16 एप्रिल ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई लखनौ सुपरजायंट्स दुपारी 3.30 वाजता
सातवा गुरुवार, 21 एप्रिल डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई चेन्नई सुपरकिंग्स सायंकाळी 7.30 वाजता
आठवा रविवार, 24 एप्रिल वानखेडे स्टेडियम, मुंबई लखनौ सुपरजायंट्स सायंकाळी 7.30 वाजता
नववा शनिवार, 30 एप्रिल डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई राजस्थान रॉयल्स सायंकाळी 7.30 वाजता
दहावा शुक्रवार, 6 मे ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई गुजरात टायटन्स सायंकाळी 7.30 वाजता
अकरावा सोमवार, 9 मे डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई कोलकाता नाईट रायडर्स सायंकाळी 7.30 वाजता
बारावा गुरुवार, 12 मे वानखेडे स्टेडियम, मुंबई चेन्नई सुपरकिंग्स सायंकाळी 7.30 वाजता
तेरावा मंगळवार, 17 मे वानखेडे स्टेडियम, मुंबई सनरायजर्स हैदराबाद सायंकाळी 7.30 वाजता
चौदावा शनिवार, 21 मे वानखेडे स्टेडियम, मुंबई दिल्ली कॅपिटल्स सायंकाळी 7.30 वाजता

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha