KKR vs GT, Match Highlites : गुजरात पुन्हा विजयी; केकेआरचा 8 धावांनी पराभव
IPL 2022 : नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स हा सामना पार पडला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाने कर्णधार हार्दिकच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते. ज्यानंतर केकेआर 20 षटकात 148 धावाच करु शकला.
सामना संपण्यासाठी काही चेंडू शिल्लक असताना आंद्रे रसेल बाद झाला आहे.
केकेआरला आता विजयासाठी अखेरच्या 12 चेंडूत 29 धावांची गरज आहे. समोर रसेल आणि उमेश आहेत.
राशिदने केकेआरचा सातवा गडी तंबूत धाडलं आहे. त्याने शिवम मावीला दोन धावांवर बाद केलं आहे.
अखेरची पाच षटकं शिल्लक असून कोलकात्याला जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. सध्या रसेल आणि मावी क्रिजवर आहेत.
अभिनव मनोहरने अप्रतिम झेल पकडत वेंकटेश अय्यरला तंबूत धाडलं आहे. अय्यरने 17 धावा केल्या आहेत. राशिदच्या नावावर ही विकेट पडली आहे.
कोलकात्याचा डाव सांभाळणारा रिंकू सिंग यशच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आहे. त्याने 35 धावा केल्या आहेत.
कोलकात्याला विजय मिळवण्यासाठी 60 चेंडूत 34 धावा करायच्या असून त्यांच्या हातात सहा विकेट्स आहेत.
केकेआरला विजय मिळवून देण्याची मोठी आशा असणारा कर्णधार श्रेयस अय्यरही 12 धावा करुन बाद झाला आहे. यशने त्याची विकेट घेतली आहे.
लॉकी फर्ग्यूसनच्या ओव्हरमध्ये नितीश राणा दोन धावा करुन तंबूत परतला आहे.
मोहम्मद शमीने आणखी एक विकेट घेतली असून त्याने सुनील नारायणला तंबूत धाडलं आहे.
सॅम बिलिंग्ज केवळ 4 धावा करुन तंबूत परतला आहे. मोहम्मद शमीने त्याला बाद केलं आहे.
हार्दिक सोडता कोणत्याच गुजरातच्या खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने गुजरातने केकेआरसमोर 157 धावांचे आव्हान ठेवले आहे.
आंद्रे रसेलने अखेरच्या षटकात 4 विकेट्स घेतल्या आहेत.
रसेलने दुसऱ्याच चेंडूवर लॉकी फर्ग्यूसनलाही बाद केलं आहे.
अभिनव मनोहर रसेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आहे.
राशिद खान आज खातंही खोलू शकला नाही. उमेश यादवने त्याचा बाद केलं आहे.
रिंकू सिंगने एक अफलातून झेल पकडत हार्दिक पंड्याला तंबूत धाडलं आहे. हार्दिकने 67 धावांची खेळी केली.
शिवम मावीने मिलरला 27 धावांवर तंबूत धाडलं आहे.
कर्णधार पांड्याच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने 100 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. 13 ओव्हरनंतर गुजरातचा स्कोर 102 वर 2 बाद झाला आहे.
KKR vs GT, Match Live Updates : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने अर्धशतकी खेळी करत गुजरातचा डाव सावरला. हार्दिक पांड्याने 36 चेंडूत 50 धावांची खेळी केली.
KKR vs GT, Match Live Updates : उमेश यादवने वृद्धीमान साहाला बाद करत कोलकात्याला दुसरे यश मिळवून दिलेय. साहा 25 धावा काढून बाद झाला.. गुजरात दोन बाद 83 धावा.
गुजरातचा सलामीवीर शुभमन स्वस्तात माघारी परतला आहे. साऊदीने त्याला सात धावांवर तंबूत धाडलं आहे.
वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), रिंकू सिंग, सुनील नारायण, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, यश दयाल, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी.
गुजरात संघाने नुकतीच नाणेफेक जिंकली असून त्यांनी प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय़ घेतला आहे.
पार्श्वभूमी
KKR vs GT, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 35 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स (KKR vs GT)या दोन संघात पार पडत आहे. यंदाच्या हंगामात (IPL 2022) गुजरात संघ सर्वात अप्रतिम कामगिरी करत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 6 पैकी 5 सामने जिंकत पहिलं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे कोलकाता संघाने 7 सामने खेळून 4 सामने गमावत केवळ 3 जिंकले आहेत. त्यामुळे आज गुजरात आपली अप्रतिम कामगिरी सुरु ठेवेल की कोलकाता पुनरागमन करेल पाहावे लागेल.
आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे. या सामन्यावरील सामने पाहता फलंदाजासाठी एक चांगली खेळपट्टी आहे. त्यात सामना दुपारच्या वेळेस होणार असल्याने दवाची अडचण देखील होणार नाही. ज्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक अडचण होणार नाही. त्यामुळे नाणेफेक जास्त मोठा प्रभाव सामन्यावर पाडू शकत नाही. त्यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेऊ शकतो किंवा फलंदाजी घेऊन एक मोठी धावसंख्या देखील उभी करु शकतो.
कोलकाता अंतिम 11
वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), रिंकू सिंग, सुनील नारायण, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
गुजरात अंतिम 11
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, यश दयाल, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी.
- DC vs RR, Top 10 Key Points : राजस्थानचा दिल्लीवर विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- IPL Full Match Highlights: राजस्थानचा धावांचा डोंगर सर करण्यात दिल्ली अपयशी, 15 धावांनी पराभव
- Asian Wrestling Championships : आशियाई कुस्ती स्पर्धेत अंशू मलिक आणि राधिकाला रौप्यपदक, मनीषाला कांस्य
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -