IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा 61 वा सामना खेळला जात आहे. येत्या 29 मे ला अंतिम सामना खेळला जाणार जाणार आहे. या हंगामात दमदार कामगिरी करणारा गुजरातचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात अनेक युवा फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे, तर काही दिग्गज खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. या यादीत केन विल्यमसन, जॉनी बेअरस्टो, किरॉन पोलार्ड, सॅम बिलिंग्ज आणि मोईन अली यांचा समावेश आहे.
केन विल्यमसन
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला आयपीएलच्या पंधरावा हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. केन विल्यमसननं 12 सामन्यांत 18.91 च्या सरासरीनं आणि 92.85 च्या स्ट्राईक रेटनं 208 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याला केवळ एकच अर्धशतक करता आलं आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 57 धावा आहे.
जॉनी बेअरस्टो
पंजाब किंग्जचा जॉनी बेअरस्टोनं यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. ज्यामुळं हैदराबादच्या संघानं त्याला अनेक सामन्यातून वगळलं. त्यानं या हंगामात 9 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 22.44 च्या सरासरीनं आणि 139.31 च्या स्ट्राईक रेटनं 202 धावा केल्या आहेत. हंमामात त्यानं 2 अर्धशतके झळकावली आहेत. यंदाच्या हंगामात त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 66 इतकी आहे.
कायरन पोलार्ड
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डनं IPL 2022 मध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 14.40 च्या सरासरीनं आणि 107.46 च्या स्ट्राइक रेटने 144 धावा केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, यंदाच्या हंगामात त्यानं एकही अर्धशतक झळकावलेलं नाही. आयपीएल 2022 मध्ये त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 25 धावा आहे.
सॅम बिलिंग्स
आयपीएल 2022 मध्ये सॅम बिलिंग्स काही खास कामगिरी करू शकला नाही. त्यानं 7 सामन्यात 22.17 च्या सरासरीनं आणि 116.66 च्या स्ट्राईक रेटनं 133 धावा केल्या आहेत. बिलिंग्सने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. यंदाच्या हंगामात त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 34 धावा आहे.
मोईन अली
मोईन अलीसाठी आयपीएलचा 15वा सीझन काही खास ठरला नाही . त्यानं 9 सामन्यात 16.78 च्या सरासरीनं आणि 125.83 च्या स्ट्राईक रेटनं 151 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याला आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. 48 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022: 'उमरान मलिकनं माझा विक्रम मोडला तर...' श्रीनगर एक्स्प्रेसबाबत शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य
- CSK vs GT, Toss Update : नाणेफेक जिंकत धोनीनं निवडली फलंदाजी; चेन्नई संघात चार बदल, पाहा आजची अंतिम 11
- CSK vs GT, Match Live Updates: चेन्नईने नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर