CSK vs GT, Match Highlights: गुजरातचा सात विकेट्सनं विजय
CSK vs GT: आज आयपीएलमधील पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडत आहे.
चेन्नई सुपरकिंग्सला आजच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. गुजरात टायटन्सनं त्यांना 7 विकेट्सनं मात दिली आहे.
रिद्धिमान साहाने दमदार अर्धशतक ठोकत गुजरातला विजयाच्या जवळ नेलं आहे.
शिवम दुबेला पाथिराना याने तंबूत धाडलं आहे.
मोईन अलीने मॅथ्यू वेडला बाद केलं आहे. वेडने 20 धावा केल्या आहेत.
गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल 18 धावा करुन बाद झाला आहे. पाथिरानाने त्याला बाद केलं आहे.
ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक आणि नारायण जगदीशन याच्या छोटेखानी खेळीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 133 धावा केल्या.
अखेरच्या षटकात फटकेबाजी कऱण्याच्या प्रयत्नात चेन्नईचा कर्णधार धोनी बाद झाला. शमीने धोनीला सात धावांवर बाद केले.
आजच्या सामन्यातही शिवम दुबेला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं शून्यावर आपली विकेट्स गमावली आहे. अल्झारी जोसेफनं त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं.
गुजरातविरुद्ध अर्धशतक खेळी करणारा ऋतुराज गायकवाड आऊट झाला आहे. त्यानं 49 चेंडूत 53 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाडच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का लागला आहे.
साई किशोरने मोईन अलीला तंबूत धाडलं आहे. मोईनने 21 धावाचं केल्या आहेत.
चेन्नईचा सलामीवीर डेवॉन कॉन्वे आज स्वस्तात बाद झाला आहे. 5 धावांवर शमीने त्याला बाद केलं.
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मग शमी.
डेवॉन कॉन्वे, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), एन. जगदीशन, मिचेल सँटनर, महेश चौधरी, मथिशा पाथिराना, सीमरजीत सिंह
सामना सुरु होण्यापूर्वी नुकतीच नाणेफेक झाली असून चेन्नईने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली आहे.
पार्श्वभूमी
CSK vs GT, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 62 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) या दोन्ही संघात पार पडणार आहे. दरम्यान आधीच प्लेऑफममध्ये स्थान मिळवणाऱ्या गुजरात संघसाठी आजचा सामना एका सराव सामन्याप्रमाणे असेल. तर चेन्नई सुपरकिंग्स संघाचं पुढील फेरीचं आव्हान आधीच संपुष्टात आल्याने त्यांच्यासाठी आजचा विजय मिळवल्यास केवळ मनाला समाधान देणाराच असेल.
आजचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात पार पडणार आहे. इतर मैदानांच्या तुलनेत काहीशी छोटी सीमारेषा असणाऱ्या या मैदानात एक मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. त्यात सामना दुपारच्या सुमारास असल्याने दोन्ही डावात दवाची अडचण येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. ज्यामुळे आज नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फंलंदाजी घेण्याची शक्यता अधिक आहे.
चेन्नई अंतिम 11
डेवॉन कॉन्वे, प्रशांत सोळंकी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), एन. जगदीशन, मिचेल सँटनर, महेश चौधरी, मथिशा पाथिराना, सीमरजीत सिंह
गुजरात अंतिम 11
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मग शमी.
हे देखील वाचा-
- LSG vs GT: आयपीएलच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच क्रुणाल पांड्या असा झालाय आऊट
- IPL 2022: 'मुंबईत आलो तेव्हा माझ्याकडं कपडे नव्हते, टॉवेलवर दोन-तीन दिवस काढले' रोव्हमन पॉवेलनं ऐकवला तो किस्सा
- LSG vs GT: लखनौच्या लाजिरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीर खेळाडूंवर भडकला, म्हणाला...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -