CSK vs GT : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 62 वा सामना आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात हा सामना पार पडत असून सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरले असून चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आधीच प्लेऑफममध्ये स्थान मिळवणाऱ्या गुजरात संघासाठी आजचा सामना एका सराव सामन्याप्रमाणे असेल. तर चेन्नई सुपरकिंग्स संघाचं पुढील फेरीचं आव्हान आधीच संपुष्टात आल्याने त्यांच्यासाठी आजचा विजय मिळवल्यास केवळ मनाला समाधान देणाराच असेल.


आजच्या सामन्यासाठीच्या दोन्ही संघाच्या अंतिम 11 खेळाडूंचा विचार करता चेन्नईने संघात तब्बल चार बदल केले आहेत. त्यांनी रॉबीन उथप्पा, अंबाती रायडू, डीजे ब्राव्हो आणि महेश तीक्षणा यांना विश्रांती देत मिचेल सँटनर, महेश चौधरी, मथिशा पाथिराना यांना विश्रांती देत प्रशांत सोळंकी, एन. जगदीशन, मिचेल सँटनर, आणि मथिशा पाथिराना यांना संधी दिली आहे. तर नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...


चेन्नई अंतिम 11 


डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, प्रशांत सोळंकी, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), एन. जगदीशन, मिचेल सँटनर, महेश चौधरी, मथिशा पाथिराना, सीमरजीत सिंह


गुजरात अंतिम 11 


रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मग शमी. 


महत्त्वाच्या इतर बातम्या