Harshal Patel : रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या (Harshal Patel) कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तो आयपीएल सामना खेळत असतानाच त्याच्या बहिणीचं निधन झालं आहे. त्यामुळे आता तो आयपीएलचा बायोबबल सोडून घरी परतला आहे. शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना पार पडल्यानंतर त्याला ही दुखद बातमी मिळाली. ज्यामुळे त्याने त्वरीतच बायोबबल सोडत पुन्हा घरी जाण्याचा निर्णय़ घेतला आहे. 


मागील दोन हंगामात हर्षलने आरसीबी संघाकडून खेळताना अप्रतिम प्रदर्शन केलं आहे. त्याने मागील स्पर्धेत तर पर्पल कॅप देखील मिळवली होती. शनिवारी आरसीबीने मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सने विजय मिळवला तेव्हा देखील हर्षलने उत्तम कामगिरी केली होती. त्याने 4 ओव्हर गोलंदाजी करत 23 धावा देत दोन महत्त्वाचे विकेट्स घेतले. दरम्यान आयपीएल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ''हर्षलच्या बहिणीचं निधन झाल्यामुळे त्याने आयपीएल बायो-बबल सोडत घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातून संघ मुंबईला निघाला असता त्याने संघाच्या बसमधून प्रवास न करता तो परस्पर घरी परतला. तसंच आरसीबीचा पुढील सामना 12 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध असून तोवर तो बायो बबलमध्ये पुन्हा परतणार आहे. परंतू त्यानंतर त्याला काही कोरोना टेस्ट देखील द्याव्या लागणार आहेत.''


आयपीएलमध्ये हर्षलचं शानदार प्रदर्शन


हर्षल पटेलने आयपीएलमध्ये 67 सामन्यात आतापर्यंत 84 विकेट्स घेतले आहेत. या दरम्यान एका सामन्यात 27 धावा देत 5 विकेट्स घेणं हे त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. याशिवाय हर्षलने 8 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 11 विकेट्स देखील घेतल्या आहेत. मागील वर्षी त्याने 15 सामन्यात 32 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली होती. यंदाही तो दमदार कामगिरी करताना दिसत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha