जेव्हा जेव्हा पोलार्डचा वाढदिवस, तेव्हा तेव्हा मुंबईचा विजय, चेन्नई बाजी पलटवणार?
CSK vs MI : आयपीएलच्या 15 व्या हंगामात अष्टपैलू कायरन पोलार्डने निराशाजनक कामगिरी केली आहे. आतापर्यंत पोलार्डमुळे मुंबईचा एकही विजय झाला नाही.
CSK vs MI : आयपीएलच्या 15 व्या हंगामात अष्टपैलू कायरन पोलार्डने निराशाजनक कामगिरी केली आहे. आतापर्यंत पोलार्डमुळे मुंबईचा एकही विजय झाला नाही. पण आज पोलार्डमुळे मुंबईचा विजय होऊ शकतो.. त्याला कारणही तसेच आहे... होय... कायरन पोलार्डच्या वाढदिवसाला मुंबई आतापर्यंत एकदाही हारली नाही. जेव्हा जेव्हा पोलार्डचा वाढदिवस होता.. त्या दिवशी मुंबईने विजय मिळवलाय. चेन्नई मुंबईचा पराभव करत प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
कायरन पोलार्डचा वाढदिवस मुंबई इंडियन्ससाठी नेहमीच लकी राहिलाय. पोलार्डच्या वाढदिवसाला मुंबईने आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही. आज पोलार्डचा वाढदिवस आहे... आजच चेन्नईचा संघ वानखेडे स्टेडिअमवर मुंबईविरोधात लढणार आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी चेन्नईला विजय अनिवार्य आहे तर स्पर्धेतील आव्हान संपलेला मुंबई अस्तितावासाठी मैदानात उतरले. त्यामुळे सामना रोमांचक होईल, याच शंकाच नाही.
पोलार्डचा वाढिदवस मुंबईसाठी लकी -
2010 मध्ये पोलार्ड मुंबईच्या संघासोबत जोडला.. तेव्हाापसून तो संघाचा सदस्य आहे. पोलार्डचा वाढदिवस 12 मे रोजी असतो... या दिवशी मुंबईने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात मुंबईने बाजी मारली आहे.
2012 मध्ये पहिल्यांदा मुंबई पोलार्डच्या वाढदिवसाला मैदानात उतरली होती. या सामन्यात मुंबईने कोलकात्याचा 27 धावांनी पराभव केला होता. पोलार्डला या सामन्यात पलंदाडी संधी मिळाली नव्हती.
सनरायजर्स हैदराबादविरोधात पोलार्डच्या वाढदिवसाला मुंबई दुसऱ्यांदा मैदानात उतरली होती. या सामन्यात मुंबईने हैदराबादचा सात गड्यांनी पराभव केला होता. या सामन्यात पोलार्डने सात चेंडूत सहा धावांची खेळी केली होती. 2019 मध्ये पोलार्डच्या वाढदिवसाला मुंबईने चेन्नईचा पराभव करत आयपीएल चषकावर नाव कोरले होते. रोमांचक सामन्यात मुंबईने अखेरच्या चेंडूवर बाजी मारली होती.
चेन्नई विरुद्ध मुंबई Head to Head -
आयपीएलमध्ये आजवर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे संघ तब्बल 33 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता मुंबईचंच पारडं जड राहिलं आहे. मुंबईने 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईने 14 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.