GT vs SRH, Match Live Updates : गुजरातचा हैदराबादवर पाच गड्यांनी विजय
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणारे गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन संघ मैदानात उतरणार आहेत.
GT vs SRH, Match Live Updates :
राहुल तेवातिया आणि राशिद खान यांनी केलेल्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर गुजरातने हैदराबादचा पाच विकेटने पराभव केलाय.
GT vs SRH, Match Live Updates :
हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याच्या वेगवान माऱ्यापुढे गुजरातची फलंदाजी ढासळली आहे. मलिकने गुजरातच्या पाच फलंदाजांना बाद केलेय. गुजरात पाच बाद 140 धावा
GT vs SRH, Match Live Updates :
युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने भेदक मारा करत गुजरातच्या चार फलंदाजांना बाद केलेय. गुजरात चार बाद 139 धावा
GT vs SRH, Match Live Updates :
वृद्धीमान साहाच्या रुपाने गुजरताला तिसरा धक्का बसला. उमरान मलिकने साहाला 68 धावांवर बाद केलेय
GT vs SRH, Match Live Updates :
196 धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादला दोन धक्के बसले आहेत. कर्णधार हार्दिक पांड्या 10 धावांवर बाद होतोय. गिल 22 माघारी परतलाय. 10 षटकानंतर गुजरात दोन बाद 90 धावा
रिद्धिमान साहा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात संघाला करुन दिली आहे. सात ओव्हरनंतर संघाचा स्कोर 68 वर शून्य बाद आहे.
गुजरात टायटन्स संघाने 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरु करताना साहा आणि गिल यांनी दमदार सुरुवात केली आहे.
अभिषेक शर्मा आणि एडन मार्करम यांनी दमदार अर्धशतकं झळकावल्यानंतर अखेरच्या षटकात शशांक सिंहने केलेल्या फटकेबाजीमुळे हैदराबादचं गुजरातसमोर 196 धावाचं आव्हान ठेवलं आहे.
अल्झारी जोसेफने हैदराबादच्या वॉशिंग्टन सुंदरला धावचीत केलं आहे.
अर्धशतक झळकावल्यानंतर यश दयाल याने एडन मार्करम याला तंबूत धाडलं आहे.
मोहम्मद शमीने सामन्यातील तिसरं यश मिळवलं आहे. त्याने नुकतच निकोलस पूरनला तीन धावांवर बाद केलं आहे.
एक दमदार असं अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेकला गुजरात्या अल्झारी जोसेफने तंबूत धाडलं आहे. शर्मा 65 धावा करुन तंबूत परतला.
सामन्यात षटकारांची बरसात करु लागलेल्या अभिषेक शर्माने 33 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं आहे.
सनरायजर्स हैदराबाद संघाच्या फलंदाजीची 10 षटकं पूर्ण झाली असून अभिषेक शर्माने डाव सांभाळला आहे. 10 ओव्हरनंतर हैदराबादचा स्कोर 84 वर 2 बाद आहे.
मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी करत हैदराबादचे दोन महत्त्वाचे फलंदाज तंबूत धाडले आहेत. राहुल त्रिपाठी आणि केन विल्यमसन बाद झाला आहे.
हैदराबादकडून अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन मैदानात आले असून दोन षटकानंतर हैदराबादचा स्कोर 22 वर 0 बाद झाला आहे.
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकिपर), शशांक सिंह, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, उम्रान मलिक, टी. नटराजन.
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल, मोहम्मद शमी
नाणेफेक जिंकत गुजरात टायटन्स संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करेल.
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकिपर), शशांक सिंह, जगदीश सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, उम्रान मलिक, टी. नटराजन.
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल, मोहम्मद शमी
गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या गुजरात आणि हैदराबाद संघामध्ये आजची लढत पाहायला मिळणार आहे.
पार्श्वभूमी
GT vs SRH, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 40 वा सामना गुजरात टायटन्स संघ विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) या दोन संघात पार पडत आहे. दोन्ही संघाचा यंदाच्या हंगामातील (IPL 2022) फॉर्म दमदार असल्याने त्यांच्यातील आजचा सामनाही चुरशीचा होईल अशी आशा सर्वांनाच आहे. गुणतालिकेचा विचार करता गुजरातने 7 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन तिसरं स्थान मिळवलं आहे.
आजचा सामना होणाऱ्या मुंबईतील वानखेडे मैदानातील सीमारेषा पाहता मोठा स्कोर उभा राहण्याची शक्यता आहे. त्यात मागील काही सामन्यांपासून प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होताना दिसत आहे. पण आजचा सामना सायंकाळी असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण होऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी देखील घेऊ शकतो. नेमका निर्णय हा सायंकाळी नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.
गुजरात संभाव्य अंतिम 11
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल, मोहम्मद शमी
हैदराबाद संभाव्य अंतिम 11
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकिपर), शशांक सिंह, जगदीश सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, उम्रान मलिक, टी. नटराजन.
हे देखील वाचा-
- आरसीबीचा पराभव करत गुजरातला टाकले मागे, राजस्थानचा हल्लाबोल, पर्पल-ऑरेंज कॅपवरही कब्जा
- IPL 2022 : हम तो डूबे हैं सनम...., मुंबई इंडियन्स कुणाची वाट लावणार? या चार संघाना धोका
- Hasan Ali : इंग्लडमध्ये हसन अलीची घातक गोलंदाजी, यॉर्कर फेकून स्टम्पचे केले तुकडे, पाहा VIDEO
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -