DC vs LSG, Match Highlights : अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या चुरशीचा सामन्यात दिल्ली पराभूत; लखनौचा सातवा विजय

आयपीएलमध्ये (IPL 2022) आज यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या लखनौ संघाची लढत दिल्ली कॅपिटल्सशी असणार आहे.

abp majha web team Last Updated: 01 May 2022 07:39 PM
DC vs LSG : दिल्ली पराभूत, लखनौची गुणतालिकेत झेप

दिल्ली संघाने अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली पण अखेर 6 धावांनी त्यांचा पराभव झाला असून लखनौने सामना जिंकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

DC vs LSG : दिल्लीला 6 चेंडूत 21 धावांची गरज

अखेरचं षटक सुरु असून दिल्लीला 6 चेंडूत 21 धावांची गरज आहे. क्रिजवर कुलदीप आणि अक्षर आहेत.

DC vs LSG : शार्दूलही बाद

संघाला अत्यंत गरज असताना शार्दूल ठाकूर केवळ एक धाव करुन बाद झाला आहे. कृणालने त्याला बाद केलं आहे.

DC vs LSG : रोवमेन पोवेल बाद

दिल्लीला मोठा झटका बसला आहे. रोवमेन पोवेल 35 धावा करुन बाद झाल्यामुळे दिल्लीचा विजय अवघड होत आहे. मोहसीनने हा महत्त्वाचा विकेट घेतला आहे.

DC vs LSG : कर्णधार पंत बाद

दिल्लीला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेला ऋषभ पंत अखेर बाद झाला आहे. त्याने 44 धावा केल्या असून अजूनही 38 चेंडूत 74 धावांची गरज दिल्लीला आहे.

DC vs LSG : मिचेल मार्श बाद

दिल्लीचा डाव सांभाळणाऱ्या मिचेल मार्शला के गौथममने बाद केलं आहे. डी कॉकने त्याची झेल घेतली आहे. मार्शने 37 धावा केल्या आहेत.

DC vs LSG : मार्शसह पंतने सांभाळला डाव

पृथ्वी आणि वॉर्नर बाद झाल्यानंतर मिचेल मार्श आणि कर्णधाल पंतने संघाचा डाव सांभाळला आहे. 6 षटकात 66 धावा दिल्लीने केल्या आहेत.

DC vs LSG : डेव्हिड वॉर्नरही बाद

मोहसीन खानने संघाला मोठं यश मिळवून दिलं आहे. त्याने वॉर्नरला तीन धावा करुन बाद केलं आहे.

DC vs LSG : दिल्लीला पहिला झटका, शॉ बाद

पृथ्वी शॉ अवघ्या 5 धावा करुन तंबूत परतला आहे. चमीराने त्याला बाद केलं आहे.

DC vs LSG : दिल्लीसमोर लखनौचं 196 धावांचं लक्ष्य

केएल राहुल आणि दीपक हुडाच्या अर्धशतकाच्या जोरावार लखनौने 195 धावा केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीला विजयासाछी 196 धावा करायच्या आहेत.

DC vs LSG : केएल राहुल बाद

77 धावांची दमदार खेळी करुन केएल राहुल तंबूत परतला आहे. शार्दूलनेच त्याला बाद केलं आहे.

DC vs LSG : केएल राहुल चमकला, दिल्लीविरुद्ध ठोकलं अर्धशतक

आयपीएलचा यंदाचा हंगाम लखनौचा कर्णधार केएल राहुलसाठी चांगला ठरला आहे. दिल्लीविरुद्ध आज सुरु असलेल्या सामन्यात त्यानं अर्धशतक ठोकलं आहे. 

DC vs LSG : दीपक हुडा अर्धशतक करुन बाद

संघाला चांगली सुरुवात करुन देऊन दीपक हुडा (52) तंबूत परतला आहे. शार्दूलनेच त्याला बाद केलं आहे.

DC vs LSG : लखनौला पहिला झटका

क्विंटन डि कॉक फटकेबाजी करुन 23 धावांवर तंबूत परतला आहे. शार्दूलने त्याला बाद केलं.

DC vs LSG : लखनौ अंतिम 11

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुड्डा, कुणाल पांड्या, मार्कस स्टोयनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, मोहसिन खान, कृष्णपा गौथम, रवी बिश्नोई

DC vs LSG : दिल्ली अंतिम 11

पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया


 

DC vs LSG : नाणेफेक जिंकत राहुलने निवडली गोलंदाजी

सामन्यात नुकतीच नाणेफेक झाली असून राहुलने काहीसा वेगळा असा प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला आहे.

DC vs LSG : लखनौची संभावित प्लेईंग XI

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुड्डा, कुणाल पांड्या, मार्कस स्टोयनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, मोहसिन खान, अवेश खान, रवी बिश्नोई

DC vs LSG : दिल्लीची संभावित प्लेईंग XI

पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया


 

DC vs LSG : आज आयपीएलमध्ये डबल धमाका

आज रविवारी आयपीएलमध्ये दोन सामने पाहायला मिळणार असून यात पहिला सामना दिल्ली आणि लखनौ यांच्यात असेल.

पार्श्वभूमी

DC vs LSG, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 45 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपरजायंट्स (DC vs LSG) या दोन संघात पार पडत आहे. यातील लखनौ संघाचा यंदाच्या हंगामातील (IPL 2022) फॉर्म दमदार असल्याने त्यांच्यासाठी आजचा सामना पुढील फेरीत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. तर दिल्लीसाठी हा हंगाम खडतर असल्याने त्यांना स्पर्धेत टिकून राहण्याकरता आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. गुणतालिकेचा विचार करता लखनौ तिसऱ्या स्थानी असून त्यांनी 9 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. तर दुसरीकडे दिल्ली 8 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह सहाव्या स्थानी आहे.  


आजचा सामना होणाऱ्या मुंबईतील वानखेडे मैदानातील सीमारेषा पाहता मोठा स्कोर उभा राहण्याची शक्यता आहे. त्यात मागील काही सामन्यांपासून प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होताना दिसत आहे. पण आजचा सामना सायंकाळी असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण होऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी देखील घेऊ शकतो. नेमका निर्णय हा सायंकाळी नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. 


दिल्ली अंतिम 11


पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया


लखनौ अंतिम 11


क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुड्डा, कुणाल पांड्या, मार्कस स्टोयनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, मोहसिन खान, कृष्णपा गौथम, रवी बिश्नोई


हे देखील वाचा-


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.