IPL 2021 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं इंडियन प्रीमियर लीगचं उर्वरित 14वं सीझन पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी कंबर कसली आहे. आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशातच चाहत्यांना आयपीएलच्या 14व्या सीझनमधील उर्वरित सामन्यांचं आयोजन पुन्हा करणार का? याची उत्सुकता लागली आहे. अशातच आयपीएलच्या आयोजनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत दुबई येथे करण्यात येणार आहे. परंतु, बीसीसीआय अशातच मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आयपीएल सीझन 14 मधील उर्वरित सामन्यांसंदर्भातील अधिकृत घोषणा 29 मे रोजी होणाऱ्या स्पेशल जनरल मिटिंगनंतर करणार आहे. 


आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये आतापर्यंत 29 सामने पार पडले होते. त्यानंतर काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, दुबईत आयपीएलची सुरुवात 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान होऊ शकते. तसेच आयपीएलचा अंतिम सामना 9 किंवा 10 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल.


यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. बीसीसीआयकडे आयपीएलचं आयोजन करण्यासाठी 20 ते 22 दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे बीसीसीआय हे सीझन पूर्ण करण्यासाठी 10 डबल हेडर सामन्यांचं आयोजन करु शकते. 



आयपीएलचं आयोजन दुबईत होणार 


आयपीएलचं आयोजन दुबईत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. गेल्या वर्षीही आयपीएलचं आयोजन दुबईत यशस्वीरित्यापार पडलं होतं. कोरोनाच्या प्रादुर्भाात दुबईत खेळवण्यात आलेल्या गेल्या सीझनमध्ये एकाह खेळाडूला अथवा स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण झाली नव्हती. तसेच यापूर्वी 2014 मध्येही आयपीएलचं आयोजन दुबईत करण्यात आलं होतं. दरम्यान, भारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशातच यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी20 वर्ल्ड कपचं आयोजनही भारताऐवजी दुबईत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयला सीझनमधील शेवटचे काही सामने दुबईतील एकाच मैदानावर खेळवावे लागू शकतात. 


आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर IPL रद्द 


दरम्यान, आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये आतापर्यंत 29 सामने पार पडले होते. त्यानंतर काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता आयपीएलचं आयोजन होणार का? झालं तर कुठे होणार आणि कधी होणार? यांसारखे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात आहेत. 4 मेरोजी मंगळवारी आयपीएल गवर्निंग काउंसिलची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बीसीसीआयनं आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बायो बबलमध्ये असूनही कोरोनाची लागण झाल्यानं बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलचे उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2021 :आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन दुबईत, सप्टेंबरमध्ये होणार सुरुवात