एक्स्प्लोर

IPL 2021: बंगळुरूपुढं मुंबईचं पारडं जड; विराटचा संघ करेल का रोहितच्या MI पलटनवर मात?

आजपासून आयपीएलच्या 14व्या सीझनला सुरुवात होणार आहे. गेल्यावर्षीचा आयपीएलचा किताब जिंकणारा संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याच्यात चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Mumbai Indians Vs Royal Challengers Banglore 1st Match Preview : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनची सुरुवात शुक्रवारी होणार आहे. गेल्यावर्षीचा आयपीएलचा किताब जिंकणारा संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याच्यात चेन्नईमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सामन्यापासून आयपीएलच्या 14व्या सीझनची सुरुवात होणार आहे.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ मुंबईवर मात करुन यंदाच्या सीझनमधील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ 2013 नंतर पहिल्यांदाच आगामी सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणारा मुंबईचा संघ गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलचा किताब जिंकत आहे. त्यामुळे यंदा मुंबईचा संघ आयपीएलचा किताब तिसऱ्यांदा जिंकत विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु, यंदा रोहित शर्माला पहिल्या सामन्यात फलंदाजीसाठी डी कॉकऐवजी क्रिस लिनसोबत ओपनिंगची जबाबदारी स्विकारावी लागणार आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, चौथ्या क्रमांकावर इशान किशन फलंदाजीसाठी मैदानावर उतरणार आहे. मुंबई इंडियन्सची सर्वात मोठी ताकद त्यांचे ऑलराउंडर हार्दिक पांड्या, किरण पोलार्ड आणि क्रुणाल पांड्या हे आहेत. हे तिनही खेळाडू टॉप ऑर्डर फ्लॉप झाल्यानंतर टीमला मोठ लक्ष्य गाठण्यासाठी मदत करतात. 

गोलंदाजीची जबाबदारी मुंबईच्या संघात ट्रेंट बोल्ट आणि राहुल चाहर यांच्या खांद्यावर असणार आहे. जसप्रीत बुमराह एक महिन्याच्या ब्रेकनंतर क्रिकेटच्या मैदानात वापसी करणार आहे. याव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स नाथन कुल्टर नाइलला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मैदानावर उतरवू शकते. 

मुंबईवर मात करण्यासाठी आरसीबीचा संघ सज्ज 

मुंबई इंडियन्सवर मात करण्यासाठी आरसीबीचा संघ आज मैदानावर उतरणार आहे. कर्णधार विराट कोहली या सीझनमध्ये देवदत्त पडिकलसोबत ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानावर उतरणार आहे. 

आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलवर 14.2 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात समावेश केला आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने आपली मिडल ऑर्डर मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. एबी डीविलियर्स पहिल्याप्रमाणेच आताही चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरणार आहे. तसेच तो विकेटकिपर म्हणूनही जबाबदारी सांभाळणार आहे. 

युजवेंद्र चहलची फिरकी गेल्या वर्षी आयपीएलमध्ये यशस्वी ठरली होती. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चहल मात्र जास्त यशस्वी ठरला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात विराट कोहलीला त्याच्याकडून जास्त अपेक्षा असणार आहेत. याव्यतिरिक्त विराट कोहलीला मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनीकडूनही लिमिटेड ओव्हर्समध्ये उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. 

आरसीबीच्या संघात ऑलराऊंडर जेमीसनवर सर्वांची नजर असणार आहे. आपसीबीने जेमीसनवर 15 कोटी रुपयांची बोली लावली आहे. न्यूझीलंडमध्ये जेमीसनने टेस्ट क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन केलं आहे. परंतु, लिमिटिड ओवर्स क्रिकेटमध्ये तो महागडा खेळाडू ठरत आहे. 

अशी असू शकते Playing 11 :

मुंबई इंडियन्स : क्रिस लिन, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), कीरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, राहुल चहर, नाथन कुल्टर नाइल, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, मोहम्मद अजहरुद्दीन, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स (विकेटकीपर), डॅनियल क्रिस्टियन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, काइल जॅमीसन, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget