एक्स्प्लोर

DC vs RCB | एबी डिव्हिलियर्सचा तुफानी डाव; बंगळुरूचे दिल्लीला 172 धावांचे लक्ष्य

DC vs RCB Score Live IPL 2021 Updates: नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 22 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकांत 172 धावांचे लक्ष्य दिलं आहे.

DC vs RCB Score : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 172 धावांचे लक्ष्य दिलं आहे. यात मिस्टर 360 अर्थात एबी डिव्हिलियर्सने 42 चेंडूत 3 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 75 धावांची खेळी केली. डिव्हिलियर्सच्या तुफानी खेळीमुळे बंगळुरू मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचू शकला. त्याच्याव्यतिरिक्त रजत पाटीदारने 31 आणि ग्लेन मॅक्सवेलने 25 धावा केल्या. तर इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, अवेश खान, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यांनी दिल्ली कॅपिटलसाठी या मोसमातील पहिला सामना खेळत प्रत्येकी एक गडी बाद केला.

टॉस जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरूला डावाची सुरुवात करण्यास आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगळुरूची सुरुवात खराब झाली. चौथ्या षटकात विराट कोहली (12) आवेश खानच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्यानंतर पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशांत शर्माने देवदत्त पडीक्कलला (17) माघारी धाडलं. 6 षटकात बंगळुरूची 2 बाद 36 धावा अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मैदानात आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने रजत पाटीदारसोबत 30 धावांची पार्टनरशीप केली. आक्रमक खेळणाऱ्या मॅक्सवेलला अमित मिश्राने तंबूचा रस्ता दाखवला. 

मॅक्सवेलनंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्सने नंतर रजत पाटीदारसोबत चांगली खेळी केली. पाटीदार 31 धावांवर बाद झाला. त्यानंतर डिव्हिलियर्सने एकहाती फटकेबाजी सुरुच ठेवली. डिव्हिलियर्सने 42 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 75 धावांची खेळी केली. 20 षटकात बंगळुरूने 5 बाद 171 धावा जमवल्या.

प्लेईंग इलेव्हन
बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर,  डॅनियल सॅम्स, काईल जेमीसन, हर्षल पटेल, यजुर्वेंद्र चहल, मोहम्मद सिराज.

दिल्ली: शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्ह स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार) शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोनिस, इशांत शर्मा, अक्षर पटेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, आवेश खान.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 03 जुलै 2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  12:00 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBhole Baba Hathras : रांगोळीसाठी महिला गोळा करतात भोलेबाबाच्या पायाखालची मातीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 03 जुलै 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Virar Attack: विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
Embed widget