IPL 2020 : इंडियन प्रिमीयर लीगच्या 13 व्या सीझनमधील दहाव्या सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांत खेळवण्यात आला. काल पार पडलेला हा सामना अत्यंत रंगतदार होता. विराट कोहलीच्या टीमने पहिल्यांदा फलंदाजी करत मुंबई इंडियन्सच्या विरोधात तीन विकेट्स गमावत 201 धावा केल्या. हे लक्ष्य गाठत मुंबई इंडियन्सची सुरुवात तशी फारशी चांगली झाली नाही. परंतु, रोहित शर्माच्या संघाने शेवटी स्कोअर बरोबरीला आणला. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. शेवटपर्यंत रंगलेल्या सुपर ओव्हरच्या थरारात अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ विजयी झाला. परंतु, मुंबई इंडियन्सच्या संघाने बंगलोरने समोर ठेवलेल्या आव्हानाचा माग घेता घेता असा काही कारनामा केला आहे, जो आतापर्यंत ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये कोणीच करू शकलं नाही.





मुंबई इंडियन्सच्या संघाला बंगलोर विरुद्धच्या सामन्यात जिंकण्यासाठी शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये 90 धावांची गरज होती. मुंबईने शेवटच्या 30 चेंडूंमध्ये 89 धावा केल्या. याआधी ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये कोणत्याच संघाने शेवटच्या 30 चेंडूंमध्ये एवढ्या धावा केल्या नव्हत्या.


मुंबई इंडियन्सने 16व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारत दाखवून दिलं की, त्यांनी अद्याप हार मानलेली नाही. 16व्या ओव्हरमध्ये मुंबईने 10 धावा काढल्या. त्याच्या पुढच्याच ओव्हरमध्ये पोलार्डने जाम्पाच्या ओव्हरला 27 धावा काढल्या. 18व्या ओव्हरमध्ये 22 धावा मुंबईच्या खात्यात जमा झाल्या. एवढंचं नाहीतर पोलार्डने फक्त 20 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. 19व्या ओव्हरमध्ये बंगलोरच्या नवदीप सैनीने मुंबई इंडियन्सला 12 धावा काढण्याची संधी दिली.


मुंबई इंडियन्सला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज होती. परंतु, संघाने 18 धावा काढत सामना बरोबरीला आणला. मुंबई इंडियन्सने शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये 89 धावा काढल्या आणि ट्वेंटी-ट्वेंटीच्या इतिहासात असं करणारा पहिला संघ ठरला.


धमाकेदार खेळीनंतरही ईशान किशन शर्माचं शतक हुकलं


यंदाच्या मोसमातला पहिलाच सामना खेळणाऱ्या मुंबईच्या ईशान किशननं बंगलोरविरुद्ध 99 धावांची झुजार खेळी उभारली. पण वैयक्तिक शतक आणि संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. मुंबईला अखेरच्या दोन चेंडूत विजयासाठी पाच धावांची गरज असताना ईशाननं मारलेला फटका थेट डीप मिडविकेटच्या हातात विसावला. पण त्याआधी ईशाननं 58 चेंडूत 2 चौकार आणि तब्बल 9 षटकारांसह 99 धावा फटकावल्या.


महत्त्वाच्या बातम्या :