RCB vs MI: आयपीएलच्या आणखी एका रोमांचक सामन्यात काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं मुंबई इंडियन्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. या सामन्यात बंगलोरनं मुंबईला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ईशान किशन आणि कायरन पोलार्डच्या 119 धावांच्या झुंजार भागीदारीनंतरही मुंबईचा संघ विजयापासून अवघी एक धाव दूर राहिला. ईशाननं 99 तर पोलार्डनं नाबाद 60 धावा फटकावल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये मुंबईला सहाच धावा करता आल्या. बंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि डिव्हिलियर्सनं सात धावा पार करुन यंदाच्या मोसमातला दुसरा विजय साजरा केला.
यंदाच्या मोसमातला पहिलाच सामना खेळणाऱ्या मुंबईच्या ईशान किशननं बंगलोरविरुद्ध 99 धावांची झुजार खेळी उभारली. पण वैयक्तिक शतक आणि संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. ईशाननं 58 चेंडूत 2 चौकार आणि तब्बल 9 षटकारांसह 99 धावा फटकावल्या. असे असे असूनही कर्णधार रोहित शर्माने त्याला सुपर ओव्हरमध्ये ईशानला फलंदाजीसाठी पाठवले नाही. मात्र, सामना संपल्यानंतर रोहितने ईशानला फलंदाजीसाठी का पाठवले नाही याचा खुलासा केला.
रोहित म्हणतो, ‘खेळाचा विचार केल्यास ही एक उत्तम सामना होता. सुरुवातीला आम्ही सामन्यात नव्हतो. पण मला खात्री होती की आम्ही 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करू शकतो. कारण आमच्या संघात अनेक तडाखेबाज फलंदाज आहेत. यात काहीच शंका नाही की, आरसीबीने आमच्यापेक्षा चांगला खेळ केला आणि म्हणूनच त्यांनी सामन्यात विजय मिळवता आला’.
किशन सुरुवातीला चांगली खेळू शकला नाही, मात्र नंतर त्याने चांगली फलंदाजी केली, केवळ पोलार्ड आणि किशन यांच्यामुळेच आम्ही सामन्यात इतके जवळ येऊ शकलो, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा कर्णधार किशन आणि पोलार्डच्या फलंदाजीबद्दल बोलताना दिली.
सुपर ओव्हरमध्ये ईशान किशनला फलंदाजीसाठी न पाठवल्याबद्दल रोहित म्हणतो, आम्ही पहिला विचार केला होती की सुपर ओव्हरमध्ये किशनला फलंदाजीसाठी पाठवावे. पण खूप वेळ फलंदाजी केल्यामुळे त्याला फ्रेश वाटतं नव्हचं, म्हणूनच आम्ही हार्दिकला फलंदाजीसाठी पाठवले.
IPL 2020 : सुपर ओव्हरमध्ये बंगलोरची मुंबईवर मात; ईशान किशन-कायरन पोलार्डची झुंजार भागीदारी व्यर्थ
VIDEO | IPL 2020 Schedule | आयपीएलच्या तेराव्या मोसमातील सामन्यांचं वेळापत्रक