एक्स्प्लोर

KXIP vs KKR : केकेआरच्या अडचणीत वाढ; सुनील नरेनच्या गोलंदाजीच्या अॅक्शन विरोधात तक्रार

आयपीएलकडून असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, सुनील नरेन विरोधात आणखी एक तक्रार आल्यास या स्पर्धेत नरेनला गोलंदाजीसाठी बंदी घालण्यात येईल. यानंतर नरेनला आयपीएलमधील गोलंदाजीसाठी बीसीसीआयच्या बॉलिंग अ‍ॅक्शन कमिटीकडून क्लीन चिट घ्यावी लागेल.

KXIP vs KKR : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मौसमात जबरदस्त फॉर्मात असलेली कोलकाता नाइट रायडर्सची टीम अडचणीत येऊ शकते. कोलकाताचा स्टार गोलंदाज सुनील नरेनच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शन विरोधात तक्रार करण्यात आली आहे. शनिवारी सुनील नरेनने कोलकात्याला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध दोन धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

सुनील नरेनच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनच्या तक्रारीबद्दल माहिती आयपीएल म्हटते, “ऑन-फील्ड अंपायर उल्हास गांधी आणि क्रिस गफाणे यांनी नरेनच्या संशयित गोलंदाजीच्या अ‍ॅक्शन विरुद्ध अहवाल तयार केला आहे. यात सुनील नरेनला ताकीत देत चेतावणी यादीत टाकण्यात आले आहे. असे असले तरी नरेनला गोलंदाजीची परवानगी देण्यात आली आहे.”

सुनील नरेनसाठी आता स्पर्धेतील पुढचा प्रवास सोपा नसरणार आहे. आयपीएलकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, नरेन विरोधात आणखी एक तक्रार आल्यास या स्पर्धेत नरेनला गोलंदाजीसाठी बंदी घालण्यात येईल. यानंतर नरेनला आयपीएलमधील गोलंदाजीसाठी बीसीसीआयच्या बॉलिंग अ‍ॅक्शन कमिटीकडून क्लीन चिट घ्यावी लागेल.

नरेन या पूर्वीदेखील त्याच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनबाबात वादात सापडला होता. नरेनच्या गोलंदाजीच्या कारवाईबद्दल 2014 मध्ये पहिली तक्रार करण्यात आली होती.

दरम्यान आयपीएल 2020 च्या 24 व्या सामन्यात शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 2 धावांनी पराभव केला. या मोसमातील पंजाबचा हा सहावा पराभव आहे. एकावेळी असे वाटत होते की पंजाब हा सामना सहज जिंकू शकेल. परंतु, शेवटच्या चार षटकांत हातात आलेला सामना गमावला. अशाप्रकारे पंजाबला सलग पाचवा पराभव पत्करावा लागला.

शेवटच्या बॉलवर असं वाटतं होतं की हा सामना टाय होईल आणि या मॅचचा निकाल सुपर ओव्हरमधून येईल. मात्र, कोलकाताच्या संघाने हा सामना काही मिलिमीटरने जिंकला. खरं तर सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर पंजाबला 7 धावांची आवश्यकता असताना मॅक्सवेलने नरेनविरुद्ध षटकार खेचला, पण चेंडू चौकारापूर्वी काही मिलिमीटर पडला आणि पंजाबला एक चौकार मिळाला. जर तो सिक्स ठरला असता तर सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी सुपर ओव्हर खेळली गेली असती.

अशा प्रकारे रोमांचक सामन्यात पंजाबचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांसह क्रिकेट दिग्गजांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी याला पंजाबचे दुर्दैव म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget