IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्स संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. संघ व्यवस्थापांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, केकेआरचा कर्णधार कार्तिकने आपलं कर्णधार पद इयोन मोर्गनकडे सोपवलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, 'दिनेश कार्तिकने संघ व्यवस्थापकांना माहिती दिली आहे की, 'आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि संघाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याने इयोन मोर्गनकडे आपल्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपावली आहे.'


दिनेश कार्तिकने आयपीएलच्या या सीझनमध्ये आतापर्यंत फक्त एकाच सामन्यात अर्धशतक फटकावलं आहे. परंतु, त्यानंतर मात्र दिनेश कार्तिक आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. दरम्यान, कोलकाताचा संघ आतापर्यंत सातपैकी चार सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.


आज कोलकाता मुंबई आमने-सामने


इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) च्या 13व्या सीझनमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. याआधी जेव्हा केकेआर विरूद्ध मुंबई सामना खेळवण्यात आला होता. त्यावेळी मुंबईने केकेआरवर मात करत विजय मिळवला होता. कोलकाता पेक्षा मुंबईच्या संघात संतुलन पाहायला मिळतं. त्यामुळे आजच्या सामन्यात कोलकाता मुंबईवर मात करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


कोलकाताच्या संघात मात्र मुंबईप्रमाणे संतुलन दिसून येत नाही. आतापर्यंत झालेल्या सामन्यांबाबत बोलायचं झालं तर, संघातील फलंदाज चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. सुनीन नरेन आणि शुभमन गिल यांना सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सलामीसाठी मैदानात उतरवणाऱ्या कोलकाताने नंतर राहुल त्रिपाठी आणि गिल यांना आजमावून पाहिलं. कोलकाचा हा निर्णय काही प्रमाणात यशस्वी झाला. पण गेल्या सामन्यात संधी देण्यात आलेला टॉम बेंटन फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात कोलकाता संघात काय बदल करणार आणि ते कितपत यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


गूगलचा घोळ : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा झाली या प्रसिद्ध खेळाडूची पत्नी


IPL 2020 : धोनीने फटकावला 102 मीटर लांब षटकार, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव; व्हिडीओ व्हायरल