IPL 2020, DC vs MI : आयपीएल 2020 मधील 51वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या आज दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी रंगणार आहे. या सीझनमध्ये याआधी ज्यावेळी हे दोन्ही संघ समोरा-समोर आले होते. त्यावेळी मुंबईने बाजी मारली होती. त्यामुळे दिल्ली आजच्या सामन्यात मुंबईवर भारी पडणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


आयपीएल 2020 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ आहे. तसेच दिल्लीला प्लेऑफ गाठण्यासाठी आजचा सामना जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. जर आजचा सामना मुंबईने जिंकला तर दिल्लीला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. आजच्या सामन्यात पराभव झाल्यास, दिल्लीला पुढिल आरसीबी विरोधातील सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. तरच प्लेऑफचं आव्हान दिल्लीचा संघ गाठू शकतो. तसेच पॉईंट टेबलमधील आपलं पहिलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्ससाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणं महत्त्वाचं असणार आहे.





सलग तिसऱ्या वर्षी मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये एन्ट्री


सलग तिसऱ्या वर्षी मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये एन्ट्री घेती आहे. मुंबई इंडियन्सने बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 5 विकेट्सनी पराभव केला. या पराभवासोबत मुंबईचा संघ आयपीएल 2020 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणारा मुंबईचा संघ आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईने आयपीएलच्या या सत्रात एकूण आठ सामन्यांमध्ये विजय मिळवला असून चार सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.





अर्ध्या सिझनपर्यंत नंबर वन असलेल्या दिल्लीवर प्ले ऑफमधून बाहेर होण्याचं संकट


इंडियन प्रीमियर लीगच्या 13 मोसमात चांगली सुरुवात केलेल्या दिल्लीचा प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा रस्ता आता कठिण झाला आहे. अर्ध्या सिझनपर्यंत टॉपवर असलेल्या दिल्लीला सलग तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळं आता त्यांच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्यावर देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवणं दिल्लीसाठी महत्त्वाचं असणार आहे.


दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ :


शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, कगीसो रबाडा, आर अश्विन, हर्षल पटेल आणि एनरिक नॉर्टजे.


मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ :


क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, क्रुणाल पांड्या, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड (कर्णधार), जेम्स पॅटिनसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.


महत्त्वाच्या बातम्या :