एक्स्प्लोर

IPL 2020 : मैदानावर उतरताच धोनी इतिहास रचणार; अशी कामगिरी करणारा सीएसकेमधील पहिला खेळाडू

IPL 2020 : आयपीएल 2020 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना रंगणार आहे. आजचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरल्यानंतर धोनी एक इतिहास रचणार आहे.

IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये सोमवारी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आपापसांत भिडणार आहेत. सीएसके आणि राजस्थान दोन्ही संघासांठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. प्ले ऑफच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी या सामन्यात दोन्ही संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी आजच्या सामन्यात उतरल्यावर इतिहास रचणार आहे.

महेंद्र सिंह धोनी राजस्थान रॉयल्स विरोधात मैदानावर उतरताच सीएसकेसाठी 200 सामने खेळाणारा पहिला खेळाडू बनणार आहे. धोनीने 2008मध्ये सीएसकेसाठी आयपीएलमधील आपला पहिला सामना खेळला होता. धोनीने काही दिवसांपूर्वीच सुरेश रैनाच्या नावावर असलेला सीएसकेसाठीचा सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड मोडला आहे.

सीएसकेसाठी आतापर्यंत खेळण्यात आलेल्या 199 सामन्यांत धोनीचा रेकॉर्ड दमदार आहे, 199 सामन्यांत धोनीने 23 अर्धशतकं आणि 4,568 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार फटकावणाऱ्यांच्या यादीत धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महेंद्र सिंह धोनीने आतापर्यंत 215 षटकार फटकावले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार क्रिस गेलने फटकावले आहेत. क्रिस गेल 333 षटकारांसोबत पहिल्या क्रमांकावर आहे. तर एबी डिविलियर्स 231 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

प्ले ऑफसाठी आवश्यक सामना

प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोनीच्या संघाला राजस्थान रॉयल्स विरोधात विजय मिळवणं अत्यंत आवश्यक आहेत. सीएसकेने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. आणि केवळ तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. जर राजस्थान रॉयल्सचा संघ या सामन्यात हरला तर त्यांनाही प्ले ऑफच्या सामन्यातून जवळपास बाहेरची वाट पाहावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

IPL 2020 MI vs KXIP | अफलातून क्षेत्ररक्षण, जबरदस्त फलंदाजी; दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मयंकची कमाल

आयपीएलच्या मैदानात 'रॉकस्टार' अंपायर, पश्चिम पाठक यांची अनोखी स्टाईल सोशल मीडियात ट्रेंड

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Embed widget