नवी दिल्ली : क्रिस गेलची बॅट ज्या वेगाने फिरते त्याच वेगाने अनेकदा तो हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो. ऑफ फिल्ड क्रिस गेलला त्यांच्या क्लासी आणि मस्तीखोर अंदाजासाठी ओळखलं जातं. पार्टीापासून ते ड्रेसिंग रूममधील मूडप्यंत क्रिस गेल नेहमीच लोकांना हसवतो. रविवारी असचं काहीसं क्रिस गेलनं केलं, ज्यामुळे तुम्हालाही हसू आवरणार नाही. क्रिस गेल माजी भारतीय क्रिकेटर युवराज सिंह याच्यासोबत हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत होता. युवराजने यादरम्यानचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


युवराजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये क्रिस गेल हिंदी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. गेल तसा हिंदी व्यवस्थित बोलतो परंतु, शेवटी मात् गेलची जीभ घसरते आणि तो काय बोलतो ते तुम्हीच व्हिडीओमध्ये पाहा...



युवराज सिंहने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये युवराज क्रिस गेलला हिंद बोलण्यासाठी मदत करत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, क्रिस गेलच्या मागे लपून त्याला हिंदीमध्ये काहीतरी बोलण्यास सांगत आहे. युवराज गेलला सांगत आहे की, 'कॉन्फिडंस मेरा, कब्र बनेगी तेरी.' हे वाक्य क्रिस गेल व्हिलनच्या अंदाजात बोलण्याचा प्रयत्न करत आहे. जसा गेल हे वाक्य बोलण्याचा प्रयत्न करतो, या वाक्याच्या शेवटी त्याची जीभ घसरते आणि तो काय बोलतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. त्यानंतर युवराज सोबतच इतर लोकही हसू लागतात.


क्रिस गेल आयपीएलच्या 13व्या सीझनसाठी पंजाबकडून खेळणार होता. परंतु, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. अशातच आधी जिथे 29 मार्च रोजी आयपीएल सुरू होणार होतं. ते आता 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे.


दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारी एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द करण्यात आली आहे. मालिकेती दुसरा एकदिवसीय सामना 15 मार्च रोजी लखनऊ येथे खेळवण्यात येणार होता. तर तिसरा एकदिवसीय सामना 18 मार्च रोजी कोलकत्ता येथे खेळवण्यात येणार होता. परंतु, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांत खेळवण्यात येणारी एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी या मालिकेतील पहिला सामना 10 मार्च रोजी पावसामुळे टॉस न होताच रद्द करण्यात आला होता.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | आयपीएलचा तेरावा सीझन लांबणीवर, 15 एप्रिलपासून सुरुवात होणार


IND Vs SA, Coronavirus | भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द