आयसीसीने आयपीएल 13च्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. आयसीसीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या सीझनची सुरुवात 29 मार्चऐवजी 15 एप्रिलपासून होईल. आयसीसीच्या घोषणेआधी अशी अटकळ बांधली जात होती की, शनिवारी (14 मार्च) होणाऱ्या आयपीएलच्या गर्व्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत या मोसमाची तारीख पुढे ढकलण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
याआधी दिल्ली सरकारने राज्यातील आयपीएल सामन्यांच्या आयोजनावर बंदी घातली होती. तर महाराष्ट्र सरकारने राज्यात आयपीएल तिकीटांच्या विक्री बंदी घालण्याची घोषणा केली होती. याशिवाय कर्नाटक सरकारचाही आपल्या राज्यात आयपीएल सामन्यांच्या आयोजनावर बंदी घालण्याबाबत विचार सुरु होता.
#CoronaVirus | आयपीएलची तिकीट विक्री होणार नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
परदेशी खेळाडूंना व्हिसा नाही
केंद्र सरकारने बुधवारी (11 मार्च) परदेशी खेळाडूंना व्हिसा देण्यास नकार दिला होता. सरकारने 15 एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आयपीएलमधील विविध संघांनी ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याची मागणी बीसीसीआयला केली होती.
29 मार्च ते 24 मे दरम्यान आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं आयोजन केलं जाईल, अशी घोषणा बीसीसीआयने सुरुवातीला केली होती. परंतु वेळापत्रकाबाबत बीसीसीआयने कोणतीही माहिती दिलेली नव्हती.
Corona effect on India vs Africa ODI series | भारत-दक्षिण आफ्रिका संघांमधील दुसरा सामना प्रेक्षकांविनाच खेळवणार