Domestic Cricket News : देशात सध्या आयपीएलचा थरार सुरु आहे. रिंकू सिंह, तुषार देशपांडे, यशस्वी जायस्वाल, मार्केंडय या सारख्या युवा खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी मिळते. आयपीएलचा थरार संपल्यानंतर देशातंर्गत क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 28 मे रोजी आयपीएल स्पर्धा संपणार आहे, त्यानंतर एक महिन्यानंतर म्हणजेच 28 जूनपासून दुलीप ट्रॉफीपासून देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. रणजी चषकाने या हंगामाचा शेवट होणार आहे. 5 जानेवारी 2024 ते 14 मार्च 2024 पर्यंत रणजी चषक होणार आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धा सहा झोनमधील संघामध्ये खेळवली जाते. या सामन्यांना रणजी चषकातील सामन्याप्रमाणे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ग्राह्य धरले जाते. 28 जून ते 26 जुलै यादरम्यान दुलीप ट्रॉफीचे आयोदन करण्यात आले आहे. दुलीप ट्रॉफीनंतर देवधर ट्रॉफी स्पर्धा रंगणार आहे. या सामन्यांना लिस्ट ए सामने म्हटले जाते. देवधर ट्रॉफीचे सामने 24 जुलै ते तीन ऑगस्ट यादरम्यान होतील. ईरानी कप एक ऑक्टोब ते पाच ऑक्टोबर यादरम्यान होणार आहे. त्यानंतर सय्यद मुक्ताक अली ट्रॉफी (टी 20 स्पर्धा) 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर यादरम्यान होणार आहे. विजय हजारे ट्रॉफी 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर यादरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे.
रणजी चषकाचे नॉकआऊट सामने कधीपासून?
5 जानेवारी 2024 पासून रणजी ट्रॉफीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत रणजी चषकातील साखळी फेरीचे सामने होणार आहेत. तर नॉकआऊट फेरीचे सामने 23 फेब्रुवारी ते 14 मार्च यादरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. रणजी चषक भरातातील देशातंर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत चार एलिट ग्रुप असतात. प्रत्येक ग्रुपमध्ये आठ आठ संघ असतात. प्रत्येक ग्रुपमधील आघाडीचे दोन संघ क्वार्टरफायनलमध्ये जातात.. येथूनच नॉकआऊट स्पर्धा सुरु होते.
रणजी स्पर्धेत एक प्लेट ग्रुपही असतो... त्यामध्ये सहा संघाचा समावेश असतो. या ग्रुममधील जे दोन संघ फायनलमध्ये पोहचातात.. त्यांना पुढील रणजी हंगमात एलिट ग्रुपमद्ये सामील केले जाते. तर एलिट ग्रुपमध्ये सर्वात खराब प्रदर्शन कऱणाऱ्या दोन संघाला पुढील हंगामात प्लेट ग्रुपमध्ये पाठवण्यात येते.
आणखी वाचा :
लखनौच्या विजयानंतर मेंटोर गौतमची गंभीर रिअॅक्शन; तोंडावर बोट, RCB च्या उत्साही चाहत्यांना इशारा?
सलग 5 षटकार मारणाऱ्या रिंकूला प्रत्येक सामन्याला किती मानधन मिळते ?